शेगाव, 4 ऑगस्ट : श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावचे प्रमुख शिवशंकर भाऊ पाटील यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्याच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. (Trustee of Sant Gajanan Maharaj Sansthan Shegaon Shivshankar Bhau Patil passed away)
काही वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण आणि नितीन गडकरी यांनी शिवशंकर पाटील यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.
श्री संत गजानन महाराज शेगांव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. शिवशंकर भाऊ यांनी समर्पित वृत्तीने व प्रामाणिकपणे श्री गजानन महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासला.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 4, 2021
संस्थानचे पावित्र्य राखण्याबरोबरच संस्थानाला सामाजिक कार्याची जोड देत त्यांनी सर्वार्थाने सामाजिक व धार्मिक कार्यात आदर्श निर्माण केला. एक व्रतस्थ कर्मयोगी म्हणून शिवशंकर भाऊ कायम स्मरणात राहतील. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 4, 2021
शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांच्या निधनामुळे आयुष्यभर निस्वार्थपणे संत गजानन महाराजांची सेवा करणारे ऋषितुल्य व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. संस्थानच्या सेवाभावी कार्याच्या विस्तारामध्ये त्यांची भूमिका नेहमी स्मरणात राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/akRu6TLB64
— Ashok Chavan (@AshokChavanINC) August 4, 2021
श्री गजानन महाराज मंदिर, शेगाव (बुलढाणा) मंदिराचे विश्वस्त श्री शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन झाले.ही बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी या देवस्थानाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण व वैद्यकीय सुविधांसह अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे सुरु केले. pic.twitter.com/7jFiEiGGMx
— Supriya Sule (@supriya_sule) August 4, 2021
मागील तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. मात्र, त्यांनी ‘मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका’ असं सांगितलं होतं. त्यांच्यावर घरीच डॉ. हरीश सराफ यांच्या देखरेखीखाली उपाचार सुरू होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sangali