तृप्ती देसाईंच्या वडिलांनी हातउसने घेतले होते पैसे परत दिलेच नाही!

तृप्ती देसाईंच्या वडिलांनी हातउसने घेतले होते पैसे परत दिलेच नाही!

तक्रारदार व दत्तात्रय शिंदे हे गगनगिरी महाराजांचे भक्त होते. त्यांनी गगनगिरी महाराजांच्या नावे धनकवडी परिसरात मठ स्थापन केला होता.

  • Share this:

पुणे,20 सप्टेंबर: सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या वडिलांनी हातउसने पैसे परत न दिल्याने त्यांना सहा महिन्यांची शिक्षा आणि 60 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एन. एन. पाटील यांनी हा निकाल दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाची शिक्षा भोगावी लागेल, असेही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

दत्तात्रय नरसिंह शिंदे असे तृप्ती देसाई यांचे वडिलांचे अर्थात आरोपीचे नाव आहे. व्यावसायिक महेशकुमार जे.अटल (रा.विश्रांत सोसायटी, विश्रांतवाडी, पुणे) यांनी 13 नोव्हेंबर 2006 मध्ये तक्रार दिली होती. तक्रारदार व दत्तात्रय शिंदे हे गगनगिरी महाराजांचे भक्त होते. त्यांनी गगनगिरी महाराजांच्या नावे धनकवडी परिसरात मठ स्थापन केला होता. त्या ठिकाणी तक्रारदार पूजेसाठी जात होते. तक्रारदार हे शिंदे यांना गुरू मानत होते. यातून शिंदे यांना तक्रारदाराकडून हात उसने पैसे घेतले होते. मात्र, पैसे मागण्यास सुरू केल्यानंतर शिंदे यांनी त्यांना पैसे परत देण्याबाबत टाळाटाळ केली. त्यामुळे अट्टल यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होते.

तब्बल 15 वर्षांनी मिळाला न्याय....

तक्रारदाराने कर्ज काढून आरोपी दत्तात्रय शिंदे यांना पैसे दिले होते. गगनगिरी महाराज नावाने पतसंस्था तसेच विविध ठिकाणी मठ स्थापन करण्याचे शिंदे यांचे काम सुरू होते. तक्रारदारांनी 11 जानेवारी 2001 ते 5 सप्टेंबर 2002 या कालावधीत शिंदे यांना पैसे दिले होते. मात्र, जेव्हा तक्रारदारांनी शिंदे यांना पैसे परत मागितले तेव्हा वेळ मागवण्यात आला. त्यानंतर शिंदे यांनी तक्रारदारांना धनादेश दिले. मात्र, ते वटले नाहीत. त्यामुळे अट्टल यांनी शिंदेविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. तब्बस 15 वर्षांनंतर हा खटला निकाली निघाला.

Loading...

तृप्ती देसाईंना घेतले ताब्यात...

पुण्यातीस भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करावे, या मागणीसाठी गंज पेठेतील महात्मा फुले वाड्यापासून बुधवार पेठेतील भिडे वाड्यापर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात तृप्ती देसाई या सहभागी झाल्या होत्या. मोर्चा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ आल्यानंतर देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलितांनी त्यांना ताब्यात घेतले. नंतर समज देऊन त्यांन सोडण्यात आले.

VIDEO:बाळा नांदगावकर म्हणाले, 'मनसेसैनिक सज्ज आहे', पण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 09:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...