'10 दिवसांमध्ये माफी मागा नाहीतर...', इंदोरीकर महाराजांना तृप्ती देसाईंची कायदेशीर नोटीस

'10 दिवसांमध्ये माफी मागा नाहीतर...', इंदोरीकर महाराजांना तृप्ती देसाईंची कायदेशीर नोटीस

तृप्ती देसाई या आक्रमक झाल्या असून त्यांनी आपल्या वकिलामार्फत इंदोरीकर महाराजांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 फेब्रुवारी : कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या विधानावरून सुरू असलेला वाद थांबता थांबेना, असं चित्र आहे. त्यातच आता पुन्हा एकदा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या आक्रमक झाल्या असून त्यांनी आपल्या वकिलामार्फत इंदोरीकर महाराजांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

'वादग्रस्त विधानाप्रकरणी 10 दिवसांमध्ये माफी मागा, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ,' असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी इंदोरीकर महाराज यांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी खेद व्यक्त केला होता. मात्र तृप्ती देसाई यांनी इंदोरकीर यांच्याकडे माफी मागण्याचीच मागणी केली आहे. त्यामुळे आता इंदोरीकर महाराज नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहावं लागेल.

दरम्यान, तृप्ती देसाई या इंदोरीकर महाराज यांच्यासाठी डोकेदुखी ठरत असतानाच त्यांचं आणखी एक कीर्तन वादात सापडलं आहे. इंदोरीकर महाराज यांनी चर्मकार समाज, आरक्षणविरोध करून राज्यघटनाचा अवमान आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

जामखेडमध्ये आठवडी बाजारातच गोळीबार, लोकांमध्ये भीतीचं वातावरण

इंदोरीकर महाराज यांच्या आरक्षणविरोध आणि चर्मकरा समाजाविषयीच्या वक्तव्याप्रकरणी अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी आंबेडकरी आणि चर्मकार समाजाचे कार्यकर्ते वर्तक वर्तक नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.

नेमकं इंदुरीकर महाराज काय बोलले होते?

'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला,'असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केल्याचं एका व्हिडिओतून स्पष्ट होत आहे.

First published: February 29, 2020, 5:01 PM IST

ताज्या बातम्या