रावसाहेब दानवेंना रस्त्यावर फटकावणार, तृप्ती देसाईंचा इशारा

रावसाहेब दानवेंना रस्त्यावर फटकावणार, तृप्ती देसाईंचा इशारा

रावसाहेब दानवे यांना शेतकरी संवाद यात्रेच नेतृत्त्व देऊन चेष्टा करणार असेल तर भुमाता बिग्रेड रस्त्यावर उतरून रावसाहेब दानवे यांना फटकवणार असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला.

  • Share this:

15 मे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना रस्त्यावर उतरून फटकावणार असल्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिलाय.

शेतकऱ्यांना साले म्हणारे रावसाहेब दानवेंना कुणी प्रदेश अध्यक्ष केलं आहे हे आम्हाला बघावे लागेल.  तुम्ही सत्तेत आहात निर्णय घेणारे आहात अशी संवाद यात्रेच ढोंग करुण जनतेमध्ये जाण्याची काय गरज आहे?,रावसाहेब दानवे यांना शेतकरी संवाद यात्रेच नेतृत्त्व देऊन चेष्टा करणार असेल तर भुमाता बिग्रेड  रस्त्यावर उतरून रावसाहेब दानवे यांना फटकवणार असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला.

'दारु मुक्त महाराष्ट्र' यासाठी तासगाव मध्ये मोर्चा काढण्यात आला. त्या नंतर तृप्ती देसाई प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. या हा मोर्चा भूमाता ब्रिग्रेडच्या तृप्ती देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आला या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या.

First published: May 15, 2017, 7:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading