परतीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात, 13 जण जखमी

परतीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात, 13 जण जखमी

अपघात झाल्यानंतर या वारकऱ्यांनी सोलपूर धुळे महामार्ग दोन तास अडवून धरत रस्त्यावरच ठिय्या मांडल्याने वाहतूक खोळंबली होती.

  • Share this:

सुरेश जाधव बीड17 जुलै : पंढरपूर वरून जालन्याकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या ट्रकला चौसाळ्या जवळ अपघात झाला. या अपघातात 13 जण जखमी झाले असून त्यातल्या तीघांची प्रकृती गंभीर आहे तर 10 वारकऱ्यांना किरकोळ दुखापत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या ट्रकला पोलिसांनी हात करुन अडविण्याचा प्रयत्न करतांना ड्रायव्हरने ब्रेक दाबला. त्यामुळे पाठिमागून येणाऱ्या टिप्पर ने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला. गंभीर जखमी वारकऱ्यांवर जिल्हा रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

भाजप आणि शिवसेनेचं जागावाटप हळूहळू उलगडत जाणार - चंद्रकांत पाटील

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीड जिल्ह्यातील चौसाळ्याजवळ वारकऱ्यांच्या ट्रकला ट्राफिक पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. या अपघातात जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धनगर पिंप्री येथील वारकरी जखमी झाले आहे. पंढरपूर वरून गावी परततानां चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. विकी जाधव (वय-25), सुरेश पवार (22), उत्तम अरगडे (60) हे वारकरी गंभीर जखमी आहेत.

मात्र केवळ पैसे घेण्यासाठीच पोलिसांनी गाडी अडविल्याचा आरोप वारकऱ्यांनी केलाय. अपघात झाल्यानंतर या वारकऱ्यांनी सोलपूर धुळे महामार्ग दोन तास अडवून धरत रस्त्यावरच ठिय्या मांडला. ट्रक अडविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याना निलंबित करा, जखमी वारकऱ्यांना मदत करा अशी मागणी वारकऱ्यांनी केलीय. वारकऱ्यांच्या या आंदोलनामुळे महामार्गावर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.

न्हाव्याने कापल्या युवा दणका संघटनेच्या अध्यक्षाच्या मिशा, नागपुरात गुन्हा दाखल

आईनेच घेतला मुलीचा जीव

नाशिक -शहरात एका 14 महिन्यांच्या चिमुरडीच्या हत्येला धक्कादायक वळण लागलं आहे. ते म्हणजे, जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीचा जीव घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. योगिता पवार असे निर्दयी आईचे नाव आहे. स्वराच्या रडण्याचा योगिता हिला कंटाळा आला होता. त्यामुळे तिने स्वराचा गळा घोटला. मुलीची हत्या केल्यानंतर तिने स्वतःच्या हातावर जखमा केल्या. अनोळखी व्यक्तीने घरात घुसून स्वराची हत्या केल्याचा बनावही तिने केला होता. उच्चभ्रू कुटुंबातील या घटनेने नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे या निर्दयी आईला 'माता न तू वैरीणी' असे म्हणण्याची वेळ आली आहे.

First published: July 17, 2019, 7:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading