मित्राला दिल्या सुखी संसाराच्या शुभेच्छा, गावी येताना ट्रकच्या धडकेत 4 मित्र जागीच ठार

मित्राला दिल्या सुखी संसाराच्या शुभेच्छा, गावी येताना ट्रकच्या धडकेत 4 मित्र जागीच ठार

दत्ता सोळंके, आकाश चौधरी, विशाल बागवाले हे रिक्षा चालक मुकुंद म्हस्के याच्यासोबत सोनपेठ तालुक्यातील चुकार पिंपरी इथं मित्राच्या लग्नाला गेले होते.

  • Share this:

बीड, 14 डिसेंबर :  मित्राचा विवाह सोहळा आटोपून गावी परतणाऱ्या रिक्षाला राखेची वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकने जोरात धडक दिली. बीड (Beed) जिल्ह्यातील गंगाखेड-परळी महामार्गावर ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींवर परळी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गंगाखेड-परळी मार्गावर करम गावाजवळ रविवारी रात्री 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अंबाजोगाई येथील दत्ता सोळंके, आकाश चौधरी, विशाल बागवाले हे रिक्षा चालक मुकुंद म्हस्के याच्यासोबत सोनपेठ तालुक्यातील चुकार पिंपरी इथं मित्राच्या लग्नाला गेले होते. मित्राचे लग्न आटोपून चौघेजण अंबोजोगाईकडे परतत होते.

ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन सुरू असताना 9 वर्षाची सौम्या वाजवत होती पियानो, पाहा VIDEO

परळी महामार्गावरील करम गावाजवळ पोहोचले असता राखेची वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवा ट्रकने रिक्षाला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, रिक्षाचा चेंदामेंदा झाला. त्यामुळे घटनास्थळावरच चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रिक्षा गाडीखाली अडकली होती. रिक्षाला बाहेर काढण्यासाठी तब्बल 2 तास लागले होते. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जेसीबीच्या मदतीने रिक्षाला बाहेर काढावे लागले होते.

आजपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन, ठाकरे सरकार 6 अध्यादेश आणणार

दत्ता सोळंके, आकाश चौधरी, विशाल बागवाले आणि रिक्षा चालक मुकुंद म्हस्के हे चारही तरुण अंबाजोगाई येथील

रायगडनगर इथं राहत होते. त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजता कुटुंबावर आणि रायगडनगरवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Published by: sachin Salve
First published: December 14, 2020, 8:26 AM IST

ताज्या बातम्या