Home /News /maharashtra /

ठाण्यात 35 टन साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, चालक गंभीर जखमी

ठाण्यात 35 टन साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, चालक गंभीर जखमी

ठाण्यातून (Thane) अपघाताची बातमी समोर येतेय. ठाणे घोडबंदर रोड (Ghodbunder Road) अपघातासाठी नेहमीच चर्चेत असतो.

ठाणे, 29 मे: ठाण्यातून (Thane) अपघाताची बातमी समोर येतेय. ठाणे घोडबंदर रोड (Ghodbunder Road) अपघातासाठी नेहमीच चर्चेत असतो. आज सकाळी ठाण्याकडून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर एका ट्रकचा मेट्रोच्या पिलरला धडक बसली. या धडकेतून हा अपघात (Accident)झाला आहे. या ट्रकमध्ये 35 टन साखर होती. हा ट्रक कोल्हापूरवरुन गुजरातकडे जात असताना हा अपघात झाला. सुरुवातीला हा ट्रक लोखंडी बॅरिकेटला धडकला. त्यानंतर मेट्रोच्या पिलरला ट्रकची धडक बसली. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोव्यातल्या प्रसिद्ध वकिलाचा भाचीसह मृत्यू; सिंधुदुर्गात आले असता काळाचा घाला  घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, वाहतूक विभागाचे कर्मचारी, एक रुग्णवाहिका आणि अग्निशमन उपस्थित राहून यांच्या मदतीने ट्रक चालकाला बाहेर काढण्यात आलं. हा अपघात भीषण असून काही प्रमाणात रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. मात्र आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल यांच्यामुळे ट्रक चालकाला अपघातीट्रक मधून काढण्यास यश आलं
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Accident, Thane

पुढील बातम्या