मॉर्निंग वॉकला निघालेल्या 3 वृद्ध महिलांना भरधाव हायवानं चिरडलं

पुणे-नगर महामार्गावर उदापूरजवळ बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या 3 वृद्ध महिलांना हायवानं चिरडलं. तिन्ही महिला जागीच ठार झाल्या. सकाळी पावणे सहा वाजता ही घटना घडली. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला.

News18 Lokmat | Updated On: May 15, 2019 06:31 PM IST

मॉर्निंग वॉकला निघालेल्या 3 वृद्ध महिलांना भरधाव हायवानं चिरडलं

रायचंद शिंदे (प्रतिनिधी),

जुन्नर, 15 मे- पुणे-नगर महामार्गावर उदापूरजवळ बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या 3 वृद्ध महिलांना हायवानं चिरडलं. तिन्ही महिला जागीच ठार झाल्या. सकाळी पावणे सहा वाजता ही घटना घडली. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. दुपारी शोकाकुल वातावरणात या तिन्ही महिलांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने आज ओतूर आणि उदापूर ग्रामस्थांनी 'गाव बंद'ची हाक दिली आहे.

मीराबाई सुदाम ढमाले-(वय- 60), कमलबाई महादेव ढमाले(वय- 62), चांगुणाबाई रामभाऊ रायकर(वय-70) अशी मृत महिलांची नावं आहेत. नगर-कल्याण महामार्गाचे नुकतेच रुंदीकरण झाले असून अपघात घडला. या ठिकाणी रस्त्याला वळण होते. याशिवाय अरुंद पूल आहे. त्यामुळे वाहनचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. फरार वाहनचालकाचा ओतूर पोलिसांनी दुपारी शोध घेत ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे अटक केली. ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक यांनी याबत माहिती दिली.असून पुढील तपास सुरू आहे. परिसरातील या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी चार तासांत फरार आरोपीला पकडलं..

रियाज मुनिझर हसन रझा (वय-28 ) असं आरोपी ड्रायवरचे नाव आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशचा रहिवाशी आहे. या अपघातातील अज्ञात वाहनाचा शोध ओतूर पोलिसांनी चार तासांच्या आत अथक परिश्रम घेऊन लावला. या अपघातातील वाहनाला टेंपररी नंबर असून वाहन क्रमांक JH.05.A.4125 हा आहे. उदापूरजवळच्या 3 वृद्ध महिलांना चिरडणाऱ्या अपघातातील ट्रक (हायवा) सापडली असून आणि आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. ओतूर पोलिसांचे हे यश आहे. आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी ठाणे जिल्ह्यतील शहापूर येथे चालक व वाहकास अटक केल्याची माहिती ओतूरचे पोलिस उपनिरीक्षक रमेश खुने यांनी दिली आहे.

Loading...


VIDEO: कोण खरं काय खोटं? भाजप-तृणमूलकडून व्हिडीओ ट्वीट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2019 06:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...