#BREAKING: हायवेवर ट्रक आणि खासगी वाहनाचा भीषण अपघात, 8 प्रवाशांचा मृत्यू

#BREAKING: हायवेवर ट्रक आणि खासगी वाहनाचा भीषण अपघात, 8 प्रवाशांचा मृत्यू

जळगावच्या ऐरंडोल तालुक्यातील पिंपळकोठाजवळील महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. अर्धा तासाआधी महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

राजेश भागवत, प्रतिनिधी

जळगाव, 23 डिसेंबर : जळगावमध्ये ट्रक आणि एका खासगी वाहनाचा अपघात होऊन तब्बल 8 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जळगावच्या ऐरंडोल तालुक्यातील पिंपळकोठाजवळील महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. अर्धा तासाआधी महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

ऐरंडोलवरून 12 ते 13 प्रवाशांची खासगी कालीपिली जळगावला जात होती. त्याचवेळी समोरून धुळ्याहून जळगावकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच 15 जी. 8474 याचा स्टेरिंगचा एक्सल तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटलं आणि ट्रक समोरून येणाऱ्या कालीपिली क्रमांक एमएच 19 वाय.5207वर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कालीपिलीमधील चालक व इतर चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर काही जखमींना ऐरंडोलच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

इतर बातम्या - उद्धव ठाकरेंच्या राज्यात शिवसैनिक शिरजोर? भरचौकात टक्कल करून मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, गंभीर अवस्थेत असलेल्या 3 प्रवाशांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या अपघातामध्ये एकूण 8 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णालयात दाखल केलेल्या जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहे. दरम्यान, अपघातामध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलीस करत आहेत.

महामार्गावर भर दिवसा झालेल्या या अपघातामध्ये खासगी वाहनाचंही मोठं नुकसान झालं आहे. तर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अपघाती वाहनं रस्त्याच्या बाजूला करण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून 5 मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहेत. तर पुढील तपास सुरू आहे.

इतर बातम्या - फडणवीसांना लवकरच कंठ फुटला, शरद पवारांची सडकून टीका

First published: December 23, 2019, 5:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading