ट्रकची सायकलला भीषण धडक, डोक्यावरून चाक गेल्यामुळे विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू!

ट्रकची सायकलला भीषण धडक, डोक्यावरून चाक गेल्यामुळे विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू!

आरती मनोज मोघाड असं मृतक शाळकरी विद्यार्थिनीचं नाव आहे. ट्रकने चिरडल्यामुळे विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Share this:

किशोर गोमाशे, प्रतिनिधी

वाशिम, 01 ऑक्टोबर : वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहराच्या मानोरा चौकात सायकलने क्लासला जाणाऱ्या 15 वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरती मनोज मोघाड असं मृतक शाळकरी विद्यार्थिनीचं नाव आहे. ट्रकने चिरडल्यामुळे विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला आहे. आरतीच्या अशा जाण्यामुळे तिच्या संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

आरती मोघाड ही कारंजा शहरातील कुंकूबाई कन्या विद्यालयात 9 व्या वर्गात शिकत होती. आज ती साडेनऊ वाजता क्लासवरून घरी जात असतांना मूर्तिजापूरकडून दारव्हा जाणाऱ्या भरधाव ट्रकने आरती मोघाडच्या सायकलला जबर धडक दिली. त्यानंतर ती खाली कोसळल्यावर ट्रकचे मागील चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने  घटस्थळीच आरती मोघाडचा मृत्यू झाला.

अपघातानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी

मानोरा चौकातील बेताल वाहतूक व्यवस्थेमुळे एका निरागस शाळकरी विद्यार्थिनींचा नाहक बळी गेला आहे. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. ट्रक चालकाच्या चुकीमुळे एक मुलीचा नाहक बळी गेला. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

इतर बातम्या - शिवसेनेकडून नवी मुंबई भाजपला आंदन, गणेश नाईकांसाठी GOOD न्यूज

घटनास्थळावरू नागरिकांना पसरवण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी आरतीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या अपघाताची माहिती आरतीच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. या बातमीनंतर संपूर्ण मोघाड कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे तर परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

इतर बातम्या - छगन भुजबळांविरोधात शिवसेनेचा हुकमी एक्का मैदानात, निकाल बदलणार का?

पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पोलीस सध्या घटनास्थळी या अपघाताची चौकशी करत आहे. तर नेमका अपघात कसा झाला हे जाणून घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या - धक्कादायक! अमरावतीमध्ये एकाच दिवशी 3 जणांची निर्घृण हत्या

VIDEO : दुर्मीळ असा पोल्का डॉटेड झेब्रा, अंगावर नाहीत काळे पांढरे पट्टे

Published by: Renuka Dhaybar
First published: October 1, 2019, 11:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading