ट्रकच्या जोरदार धडकेत बसचा चक्काचूर; शिक्षक जागीच ठार, 7 जखमी

ट्रकच्या जोरदार धडकेत बसचा चक्काचूर; शिक्षक जागीच ठार, 7 जखमी

पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला पाठीमागून जोरदार धडक दिली.

  • Share this:

कोल्हापूर, 3 जानेवारी : भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून इतर 7 जण जखमी झाले आहेत. उद्धव सदाशिव पाटील (वय 56, रा. पेठवडगाव, ता. हातकणंगले) असं अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकाचं नाव आहे.

पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसचा चक्काचूर झाला. त्यानंतर स्थानिकांनी अपघात स्थळावर धाव घेतली. स्थानिकांनी बसमधील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र या अपघातात बसमधीलच उद्धव पाटील या शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला.

पुण्यात दोन गटामध्ये तुफान हाणामारी, 4 दुचाकी जाळल्या

पुणे-बंगळुरू महामार्गावरील अपघातातील जखमींमध्ये कोल्हापूर जिल्हासह काही मुंबईतील रहिवाश्यांचाही समावेश आहे. मधुकर यादव (वय 50, रा. कणेरीवाडी, ता. करवीर), गौरू सुतार (54, रा. सदर बाजार कोल्हापूर), रुपा सुतार (55, रा. मुलुंड, मुंबई), रमेश गुरव (65, रा. मुलुंड, मुंबई), शिवराम चौधरी (26, रा. कागल), चालक हंबीरराव यादव (57, रा. वरणगे पाडळी, ता. करवीर), सतीश कुंभार (55, रा. बापट कॅम्प कोल्हापूर) या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धक्कादायक! महाराष्ट्रात एका महिन्यात 300 शेतकऱ्यांची आत्महत्या, सत्तानाट्य सुरू असताना शेकडो कुटुंब उघड्यावर

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताचं प्रमाण लक्षणीय वाढलं आहे. अनेक महामार्ग मृत्यूचे सापळे ठरत आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-गोवा, पुणे-बंगळुरू या महामार्गांवर सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी प्रशासकीय उपाययोजनांसह चालकांनीही वाहन चालवताना नियमांची अंबलबजावणी करण्याची गरज बोलून दाखवण्यात येत आहे.

First Published: Jan 3, 2020 08:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading