सुमित सोनवणे, दौंड (पुणे), 26 जून : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 20 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. दौंडमधील लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील मसणेरवाडी जवळ ही दुर्घटना घडली.
साखर वाहतूक करणाला दहा चाकी ट्रक आणि होंडा शाइन या गाडीचा समोरासमोर अपघात होऊन साखरेने भरलेल्या दहा चाकी ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या ओढ्यामध्ये जाऊन पलटी झाला. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्या सोबत असलेली आई गंभीररित्या जखमी झाली आहे. जखमी झालेल्या आईला दौंड शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांचीदेखील प्रकृती गंभीर आहे.
ट्रक चालक दौंड शुगर कारखान्याकडून साखरेने भरलेला ट्रक घेऊन दौंडच्या दिशेने निघाला होता. तर दुचाकीवर असलेले आई व मुलगा दौंडकडून आपल्या गावी हिंगणी बेर्डी ता. दौंड या ठिकाणी निघाले होते. पण लिंगाळी हद्दीतील मसणेरवाडी ओढ्याजवळ वळणावर समोरच्या गाडीचा अंदाज न आल्याने समोरासमोर धडक होऊन यामध्ये नितीन गौतम माने वय वर्ष 20 मुलाचा मृत्यू झाला असून आई सुलाबाई गौतम माने वय वर्षे 45 गंभीररीत्या जखमी झाले आहे.
साखर वाहतूक करणारा ट्रक शेजारील ओढ्यामध्ये जाऊन पडला. यामध्ये अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी अधिक तपास दौंड पोलीस करत आहेत.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune news