ठाणे 26 जुलै : ठाण्याच्या कापूरवाडीजवळील एचपी पेट्रोल पंपासमोर राजस्थानहून संगमरवरी घेऊन ठाण्याकडे येणारा ट्रक दिशा दर्शक खांबाला धडकला. ही धडक इतकी भयानक होती, की चालकासह तीन लोक आतमध्येच अडकले. घटनेची माहिती कापुरवाडी पोलीस स्टेशनमध्ये मिळताच वाहतूक विभाग, ठाणे आपत्ती विभाग, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहोचले.
‘मिठी’ कोपली, मुंबई बुडाली, माणसं वाहिली; तो दिवस आजही मुंबईकरांच्या अंगावर आणतो काटा
2 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर ट्रकच्या आतमध्ये अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. घटनेत ट्रक चालक जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कापूरवाडीजवळील एचपी पेट्रोल पंपासमोर राजस्थानहून संगमरवरी घेऊन ठाण्याकडे येणारा ट्रक दिशा दर्शक खांबाला धडकला pic.twitter.com/JauRMApt6P
— News18Lokmat (@News18lokmat) July 26, 2022
राजस्थानच्या चित्तौडगड येथून 25 टन संगमरवरी दगड घेऊन हा ट्रक ठाण्याच्या वागळे इस्टेट इथे येत होता. यावेळी घोडबंदर रोडवरुन येत असताना ट्रक चालकाचं नियंत्रण बिघडलं आणि या ट्रक दिशा दर्शक खांबाला धडकला.
मंदिरासमोर झोपलेल्या नागरिकांना गाडीने चिरडलं, एकाचा मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO
सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, हा अपघात इतका विचित्र होता की ट्रक चालकासह दोघेजण आतमध्येच अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी अनेक तास प्रयत्न केले गेले. 2 तासानंतर अखेर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Road accident, Truck accident