अंबेनळी घाटात 200 फूट खोल दरीत ट्रक कोसळला

truck accident in satara ambenali : अंबेनळी घाटात झालेल्या ट्रक अपघातात ड्रायव्हर आणि त्याचा साथीदार सुदैवानं बचावले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 12:40 PM IST

अंबेनळी घाटात 200 फूट खोल दरीत ट्रक कोसळला

सातारा,किरण मोहिते, 28 जून : पावसाळ्यात घाटामध्ये गाडी चालवताना चालकांना विशेष काळजी घेण्याची गरज आहेत. कारण, अंबेनळी घाटात झालेल्या ट्रक अपघातात ड्रायव्हर आणि त्याचा साथीदार नशीबानं बचावले आहेत. साखरेची पोती घेऊन हा ट्रक चालला होता. या ट्रकला अपघात झाल्यानंतर घटनेचं गांभीर्य ओळखून ड्रायव्हर आणि त्याचा साथीदारानं उडी मारल्यां दोघांचा जीव वाचला आहे. तर, जवळपास 200 फुट खोल दरीत हा ट्रक कोसळला आहे. पोलादपूर ते प्रतापगड घाटातील ही घटना आहे. अपघातानंतर महाबळेश्वर ट्रकर्सची टीम ही घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांना मदतकार्य सुरू केलं आहे.

पावसाळ्यातून अपघातांच्या संख्येत होते वाढ

पावसाळा सुरू झाला असल्यानं पावसाळ्यामध्ये घाटांमध्ये होणाऱ्या अपघातांच्या संख्यांमध्ये देखील वाढ होते. घाटामध्ये दरड कोसळत असल्यानं चालकांना विशेष काळजी घ्यावी लागते. यावेळी वेगावर देखील नियंत्रण ठेवावं लागत. त्यामुळे चालकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन देखील वाहतूक विभागाकडून केलं जातं. पावसाचा जोर वाढत असताना घाटांमधील वाहतूक देखील धोकादायक बनते.

पावसाचा वाढता जोर

दरम्यान, मागील चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं वाहतूक विभागानं देखील चालकांना वेगावर नियंत्रण ठेवा असं आवाहन केलं आहे. जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील. पावसामुळे घाटांमधील वहतूक देखील अवघड होऊन बसते.

Loading...

तरुणांच्या टोळीनं साधूला बेशुद्ध होईपर्यंत मारलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 12:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...