नवी मुंबई तिहेरी हत्याकांडाने हादरली, तुर्भे एमआयडीसीतील घटना

आर्थिक व्यवहारातून नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीतील इंदिरा नगरात रिकोंडा येथे तिघांची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2019 07:21 PM IST

नवी मुंबई तिहेरी हत्याकांडाने हादरली, तुर्भे एमआयडीसीतील घटना

नवी मुंबई, 13 जुलै- आर्थिक व्यवहारातून नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीतील इंदिरा नगरात रिकोंडा येथे तिघांची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ही घटना समोर आली. तुर्भे एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

इरशाद शेख (20), नौशाद शेख (17) आणि राजेश (28) अशी हत्या झालेल्या तिघांची नावे आहेत. ते कामगार असून एका भंगाराच्या गोदामात तिघांचे मृतदेह आढळले आहेत. आर्थिक देवाणघेवाणीतून हे हत्याकांड झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. सध्या एमआयडीसी पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमार्टमसाठी वाशी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

शिर्डीत एकाच कुटुंबातील तिघांची गळा चिरून हत्या...

शिर्डी येथे शनिवारी भल्या सकाळी एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण कुटुंबावर झालेल्या या हल्ल्यात जखमी झालेले दोन जण अत्यवस्थ असून त्यांना साईबाबा संस्थान रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

निमगाव शिवारात आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर राहणाऱ्या ठाकूर कुटुंबीयांवर हल्ला करण्यात आला. हल्ला करणारा आरोपी अर्जुन पन्हाळे हा शेजारीच राहणारा असून किरकोळ वादातून हा प्रकार झाल्याची माहिती आहे. आरोपी अर्जुन पन्हाळे याने कोयत्याने ठाकूर पती-पत्नींचे गळे कापले. तसंच त्यांची 16 वर्षांची मुलगी शाळेत जाण्यासाठी आवरत असताना तिचीही कोयत्याने हत्या केली. या हल्ल्यात राजेंद्र ठाकूर आणि याच कुटुंबातील आणखी एक मुलगी जखमी असून त्यांना साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये एक सहा वर्षांची चिमुकली थोडक्यात बचावली आहे. या घटनेची पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पोलीस निरीक्षक अनील कटके अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता. हत्येनंतर आरोपी शेजारीच असलेल्या आपल्या खोलीत जाऊन बसला. त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Loading...

VIDEO : पालकांनो, बाळांकडे लक्ष द्या! चिमुरड्याने गिळले नाणे!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 13, 2019 07:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...