विसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक

विसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक

गणेश विसर्जन मिरवणुकीत तीन जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी

नाशिक, 24 सप्टेंबर : नाशिकमध्ये बाप्पाच्या विसर्जनावेळी एक अमानुष प्रकार समोर आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत तीन जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. नाशिकच्या इगतपुरी मधील धक्कादायक घटना आहे यात एकाची प्रकुर्ती अतिशय गंभीर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.  या प्रकरणात आरोपी कुणाल हरकारेला पोलिसांनी इगतपुरीमधूनच अटक केली आहे. जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विसरर्जनावेळी झालेला किरकोळ वाद थेट एकमेकांना जाळल्यापर्यंत पोहचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर हा प्रकार घडताच तात्काळ इतर गणेश भक्तांकडून जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. यातील 2 जणांची प्रकृती योग्य आहे पण एकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे तिघेही जण गणपती विसर्जन पाहण्यासाठी आले असल्याचं सांगण्यात येत आहे. पण दोन गटात किरकोळ कारणारून वाद झाला आणि त्यात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून पोलीस आता या घटनेचा तपास करत आहेत. पण या सगळ्या प्रकारामुळे बाप्पाच्या या मंगलमय मुरवणुकीत गालबोट लागलं इतकं नक्की.

 

VIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2018 09:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading