गिर्यारोहक अरुण सावंत हरिश्चंद्र गडावर या ठिकाणी करत होते रॅपलिंग, इथेच घात झाला!

गिर्यारोहक अरुण सावंत हरिश्चंद्र गडावर या ठिकाणी करत होते रॅपलिंग, इथेच घात झाला!

अरूण सावंत यांच्या अपघाती निधनानं गिर्यारोहकांनी एक निष्णांत वाटाड्या कायमचा गमावला आहे.

  • Share this:

वैभव सोनवणे, प्रतिनिधी

पुणे, 19 जानेवारी : सह्याद्रीची घोरपड म्हणून प्रसिद्ध असलेले गिर्यारोहक अरुण सावंत यांचा हरिश्चंद्र गड परिसरात रॅपलिंग दरम्यान अपघाती मृत्यू झाला. गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ सह्याद्रीच्या कड्याकपारीत गिर्यारोहकांना वाट दाखवणारे निष्णात गिर्यारोहक म्हणून प्रसिद्ध होते.

महाराष्ट्राचे नावाजलेले ट्रेकर अरूण सावंत यांचा कोकणकड्यावरून रॅपलिंग करत असताना दरीत पडून मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हरिश्चंद्र गडाच्या कोकणकड्याहून माकडनाळकडे चढाई करत असताना अरूण सावंत हे साडे पाचशेहून फूट खाली दगडावर कोसळले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांना बाहेर आणण्यासाठी पुणे पनवेल आणि लोणावळाच्या रेसक्यू टीम प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यात गिर्यारोहकांना सुरक्षित वाट दाखवणारे अरूण सावंत यांच्या मृत्यूमुळे  गिर्यारोहकांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ  ज्या सह्याद्रीच्या कड्याकपारीत पायवाट शोधली, तिथचं त्यांना मृत्यूनं गाठलं.

शनिवारी सकाळी अरुण सावंत आपल्या टीमसह हरिश्चंद्र गड परिसरात रॅपलिंगसाठी आले होते. विशेष, म्हणजे या मोहिमेचे ते  नेतृत्व करत होते. माकडनाळ कड्यावर रोप बोल्ट तयार करीत असताना असताना ते साडेपाचशे फूट खोल दरीत कोसळे आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.

अरुण सावंत महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी गिर्यारोहक म्हणून प्रसिद्ध होते. गेली 35 वर्षांहून अधिक काळ त्यांना गिर्यारोहणाचा अनुभव होता. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये त्यांनी गिर्यारोहकांसाठी अनेक सुरक्षित वाटा शोधल्या होत्या. लोणावळ्यातील 'ड्यूक्स नोज'ची मोहीम फत्ते करणारा पहिला गिर्यारोहक म्हणूनही त्यांची ख्याती होती.

नवख्या गिर्यारोहकांचे मार्गदर्शक होते. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांची त्यांना खडान‌्खडा माहिती होती. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील सांधण व्हॅली, कोकणकडा रॅपलिंग, थिटबी वॉटरफॉल रॅपलिंग यासारख्या रॅपलिंगच्या जागा त्यांनी शोधल्या. अनेक कड्यांवर त्यांनी केलेल्या बोल्टिंगचा आधार घेऊन गिर्यारोहक चढाई करतात. अरूण सावंत यांच्या अपघाती निधनानं गिर्यारोहकांनी एक निष्णांत वाटाड्या कायमचा गमावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2020 11:17 PM IST

ताज्या बातम्या