Home /News /maharashtra /

राजकीय भूकंप घडवणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर झाडं कोसळलं, ठाणे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या गाडीवर आदळलं

राजकीय भूकंप घडवणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर झाडं कोसळलं, ठाणे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या गाडीवर आदळलं

सुदैवाने गाडीमध्ये कुणीही नसल्यामुळे मोठी हानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

सुदैवाने गाडीमध्ये कुणीही नसल्यामुळे मोठी हानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

सुदैवाने गाडीमध्ये कुणीही नसल्यामुळे मोठी हानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

ठाणे, ०५ जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप घडवला. महाविकास आघाडीला सत्तेवरून खाली खेचले आहे. अजूनही विरोधकांच्या गटात हादरे सुरूच आहे. तर दुसरीकडे, ठाण्यात पावसाने (thane Rains Update) धुमशान घातले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थनासमोरील भलेमोठे झाड कोसळले आहे. हे झाड ठाणे पालिकेचे अतिरिक्त आयुक्तांच्या गाडीवर कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही हानी झाली नाही. ठाण्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमशान घातले आहे. मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर मोठं झाड कोसळल्याची घटना घडली. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर रस्ते दुरुसतीचे काम सुरु असतांना झाड कोसळण्याची घटना घडली. हे झाड ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्या गाडीवर कोसळलं. सुदैवाने गाडीमध्ये कुणीही नसल्यामुळे मोठी हानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहे. युद्धपातळीवर झाड हटवण्याचे काम सुरू आहे. तुर्तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. दरम्यान,जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागांत दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत कालपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आज मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर बीएमसी आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट पॉईंटवर मोडवर आहेत. दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा "ऑरेंज अलर्ट" (orange alert in Konkan) देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. (imd alert heavy rain) दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाडा, विदर्भात विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (weather update) तसेच दोन दिवसांपासून मुंबईसह कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस (Heavy rains in Mumbai) कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. याप्रमाणेच या भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील सायन परिसरात पाणी साचल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या