ठाण्यात रिक्षावर कोसळले झाड, दोन जणांचा जागीच मृत्यू

ठाण्यात रिक्षावर कोसळले झाड, दोन जणांचा जागीच मृत्यू

रिक्षाचालक एका प्रवाशाला घेऊन जात असताना अचानक एक झाड रिक्षावरच कोसळले.

  • Share this:

ठाणे, 22एप्रिल : ठाण्यातील (Thane) गडकरी रंगयातन परिसरात रिक्षावर ( Auto riksha ) झाड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत रिक्षाचालक आणि एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज रात्रीच्या सुमारास  गडकरी रंगायतनसमोर पाली तलावाजवळ ही दुर्घटना घडली. रिक्षाचालक एका प्रवाशाला घेऊन जात असताना अचानक एक झाड रिक्षावरच कोसळले. झाड रिक्षावर कोसळल्यामुळे रिक्षातील चालकाचा आणि प्रवाशाचा जागेवरच मृत्यू झाला. या दुर्घटनेत रिक्षा चक्काचूर झाली आहे.

रेमडेसिवीर निर्माता कंपन्यांचं महत्त्वपूर्ण पाऊल; रुग्णांना देणार मोठा दिलासा

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. उन्मळून कोसळलेले झाड बाजूला करण्यात आले आहे. मृत व्यक्तींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Published by: sachin Salve
First published: April 22, 2021, 12:12 AM IST
Tags:

ताज्या बातम्या