Home /News /maharashtra /

मास्क न वापरता कोरोनाबाधित रुग्णांवर बिनधास्त उपचार, डॉक्टरावर गुन्हा दाखल

मास्क न वापरता कोरोनाबाधित रुग्णांवर बिनधास्त उपचार, डॉक्टरावर गुन्हा दाखल

धक्कादायक म्हणजे, डॉ. गुप्ता स्वत: मास्क वापरत नाही आणि इतर रुग्णांना सुद्धा मास्क न वापरण्यास सांगत आहे.

वांगणी, 08 मे : कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढू नये म्हणून राज्यातील डॉक्टर (Doctor) आणि आरोग्य यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करत आहे. मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढत आहे. पण, मुंबई जवळील बदलापूर (Badalapur) येथील वांगणी (Wangani) इथं एक डॉक्टर मास्क न वापरा कोरोना रुग्णावर उपचार करत असल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापूर येथील वांगणीमध्ये डॉ.उमाशंकर गुप्ता (Dr.umashankar Gupta) असं या डॉक्टराचं नाव आहे. वांगणीमध्ये शिला क्लिनिक नावाने छोटेखानी दवाखाना उभारला आहे. या डॉक्टराचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. कोरोनाबाधित रुग्ण आपण बरे केले असल्याचा दावा त्याने केला आहे. ऑक्सिजन लेव्हल कमी झालेल्या रुग्णांसुद्धा आपण काही तासांत बरे केल्याचा दावाही गुप्ता यांनी केला असून रुग्णांकडून तसे बोलवून सुद्धा घेतले आहे. सोन्याच्या खरेदी-विक्रीबाबतचा हा नियम बदलणार, तुमच्या दागिन्यांवर होणार परिणाम? धक्कादायक म्हणजे, डॉ. गुप्ता स्वत: मास्क वापरत नाही आणि इतर रुग्णांना सुद्धा मास्क न वापरण्यास सांगत आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली. त्यानंतर बदलापूर ग्रामीण पोलिसात रितसर तक्रार  दाखल केली. आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून डॉ. गुप्ता आणि त्याची सहकारी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवराच नाही तर सासऱ्याच्या पायाखालचीही सरकली जमीन, नवरीचं कृत्य वाचून व्हाल हैराण कोरोनाचा संसर्ग पसरवण्यासाठी कारणीभूत ठेवण्याचा ठपका ठेवून शासकीय नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची या डॉक्टराकडे कोणतीही परवानगी नव्हती. तरी सुद्धा रुग्णांना दाखल करून उपचार करत होता. या प्रकरणी अद्याप डॉ. गुप्ता यांना अटक करण्यात आली नसून पोलीस अधिक तपास करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या