मुंबईतील रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये सुरू होते उपचार; आईच्या मृत्यूनंतर तरुणाने सांगितलं धक्कादायक वास्तव

मुंबईतील रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये सुरू होते उपचार; आईच्या मृत्यूनंतर तरुणाने सांगितलं धक्कादायक वास्तव

मुंबईतील मरोळ भागात राहणाऱ्या या वृद्ध महिलेला श्वास घेताना त्रास होत असल्याने मुलाने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते

  • Share this:

मुंबई, 28 जून : कोरोनावर उपचार घेत असलेल्या 62 वर्षीय महिलेचा (Covid -19) मुंबईतील रुग्णालयात मृत्यू झाला. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, महिलेच्या मृत्यूमागे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप मुलाने केला आहे.

कोविड -19 च्या उपचारासाठी सुरू असलेल्या या सेंटरमध्ये महिलेला इमारतीच्या बेसमेंटमध्ये बेड दिला होता. कोरोना ट्रीटमेंटमध्ये शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि रुग्णाला खुल्या ठिकाणी ठेवण्याचे निर्देश दिले जातात, तर दुसरीकडे तळघरात गळतीमुळे बराच ओलावा होता. व्हेंटिलेटरची कोणतीही व्यवस्था नव्हती. महिलेला पायर्‍या चढून वॉशरूममध्ये जावे लागत होते.

श्वासोच्छवासाच्या समस्येनंतर केलं भरती

मुंबईतील मरोळ भागात राहणाऱ्या या वृद्ध महिलेला श्वास घेताना त्रास होत असल्याने मुलाने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. 3 जून रोजी हासीर हॉस्पिटल आणि आयसीयू सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी मुलाने इतर अनेक सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या फेऱ्या मारल्या होत्या. पण बेडच्या कमतरतेचे कारण सांगून महिलेला कुठेच दाखल करुन घेतले जात नव्हते.

हे वाचा-चिकनऐवजी पतीनं आणली प्लेन बिर्याणी, संतापलेल्या पत्नीनं उचललं धक्कादायक पाऊल

मुलगा म्हणाला की, हासीर रुग्णालयाने तपासणी व उपचार करण्याचे आश्वासन दिले. कुटुंबाने सांगितले की, या महिलेला उच्च रक्तदाब आणि थायरॉईडची समस्या देखील होती.

रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले

हे वाचा-कोरोना झाला तर 2 लाख रुपये देणार; या देशाची परदेशी पर्यटकांना ऑफर

तळघरात ओलावा आणि वॉशरूम नसल्याचा आरोप मुलाने केला आहे. तो असेही म्हणाला की, कोणतीही नर्स पेशंटला भेटायला आली नव्हती. वयस्कर असूनही वॉशरूम नसल्यामुळे महिलेला पायर्‍या चढून जावे लागत होते. तेथे व्हेंटिलेटरची यंत्रणाही नव्हती. तळघरात गळती होत असल्याने पुठ्ठा ठेवला होता. तळघरात बेड असल्याचे रुग्णालयाने त्यांना सांगितले नव्हते, असा आरोप मुलाने केला आहे. मात्र  रुग्णालयाचे संचालक झैद खान यांनी सांगितले की, रुग्ण दाखल होण्यापूर्वी आम्ही तळघरात बेड असल्याचे कुटुंबाला सांगतो. जेव्हा कुटुंब पूर्णपणे सहमत असेल तेव्हाच रुग्णाला दाखल केले जाते.

दुसरीकडे मुलगा म्हणतो की रुग्णालय प्रशासन खोटे बोलत आहे, त्याला तळघरात बेड असल्याचे सांगण्यात आले नाही. झैद खान पुढे म्हणाले की, बेड नसल्यामुळे अनेक रूग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयाने तळघरात तीन बेड ठेवले आहेत. एवढेच नव्हे तर प्रसूती वॉर्डचेही कोविड – 19  प्रभागात रूपांतर केले आहे. झैद खानने मुंबई मिररला सांगितले की, पेशंटला तळघरात काही तास ठेवले जाते. मुलाकडून आईच्या तीन दिवसांच्या उपचारासाठी 65000 रुपयांचे बिल देण्यात आले आहे. उपचार चांगले झाले असते तर आई वाचली असल्याची भावना मुलाने व्यक्त केली आहे.

 

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: June 28, 2020, 4:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading