राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

भुजबळ यांच्यासारख्या राज्यातील एका मोठ्या नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ माजली आहे.

  • Share this:

नाशिक, 28 ऑक्टोबर - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राच्या माध्यमातून ही धमकी दिली गेलीय.  छगन भुजबळ यांच्या नाशिकच्या घरी जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र पाठवण्यात आलं आहे.

छगन भुजबळ यांच्यासारख्या राज्यातील एका मोठ्या नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते या संदर्भात लवकरच नाशिक पोलिसांना भेटणार असल्याची माहिती आहे.

धमकीचं पत्र नेमकं कुणी पाठवलं आहे आणि छगन भुजबळांना अशी धमकी देण्यामागील त्या व्यक्तीचा काय उद्देश आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात अटक करण्यात आलेल्या छगन भुजबळ यांची काही दिवसांपूर्वीच जामीनावर सुटका झाली आहे. महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स आदी प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्य़ांप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना सक्तवसुली महासंचालनालयाकडून(ईडी) अटक करण्यात आली होती.

 VIDEO : गडकरी आणि मुख्यमंत्र्यांकडून महापौरांना जोरदार कानपिचक्या

First published: October 28, 2018, 2:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading