मुंबई,12 जून- ट्रान्सजेंडरच्या अल्पवयीन मुलीने मुंबईत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सायन भागातील कोळीवाड्यात राहणाऱ्या 14 वर्षांच्या कलगीने सोमवारी (10 जून) राहत्या घरात आत्महत्या केली.
मिळालेली माहिती अशी की, कलगी ही नववीची विद्यार्थिनी होती. कलगी ही अनाथ होती. ती पद्मा देवी नामक ट्रान्सजेंडरकडे राहत होती. 2006 मध्ये पद्मा देवीली एका मंदिराच्या पायऱ्यांवर कलगी बेवारस अवस्थेत सापडली होती. तेव्हा कलगी ही नवजात शिशू होती. त्यावेळी कलगी देखील ट्रान्सजेंडर सारखीच दिसत होती. नंतर पद्मादेवीने लाखो रुपये खर्च करुन कलगीवर अत्यंत जटील शस्त्रक्रिया करवून घेतली होती. त्या नंतर कलगी सामान्य मुलीसारखी दिसत होती. पद्मा देवी एका विशेष पूजेसाठी कर्नाटकात गेली असताना कलगीने राहत्या घरात आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुण्यात लव्ह ट्रॅंगल: सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रेयसीची केली निर्घृण हत्या
अपहरण झालेल्या चिमुरड्याची सुटका..
भिवंडी शहरातील धामणकर नाका उड्डाणपुलाखालून आईच्या कुशीत झोपलेल्या एक वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना घडली होती. 3 जून रोजी घडलेली ही घटनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या घटनेचा 'न्यूज 18 लोकमत'ने पाठपुरावा केला होता. भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अपहरण झालेल्या चिमुरड्याची उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथून सुटका केली. या प्रकरणी एका पुरुषासह दोन महिलांना अटक केली आहे.
VIDEO: स्पाईस जेट विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, थोडक्यात दुर्घटना टळली