• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • भाजप आमदारावर गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली

भाजप आमदारावर गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली

आपल्या साथीदारांचे अश्रू पाहून मिलिंद गायकवाड यांनाही अश्रू रोखता आले नाही.

 • Share this:
  वैभव सोनावणे, 18 आॅक्टोबर : शाळेतील आवडत्या शिक्षकांची बदली झाल्यावर विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाल्याची घटना आपण पाहत आलो. पण पुण्यात एका पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीमुळे वर्दीतल्या माणसाला अश्रू अनावर झाले. भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील आमदार योगेश टिळेकर यांच्यावर 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेले पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची आज बदली करण्यात आली. पोलीस दलात बदली होणे हे नेहमीचे आले. मात्र, ज्या अधिकाऱ्यासोबत खांद्याला खांदा लावून गुन्ह्याचा चढा  लावला त्या अधिकाऱ्याला सोडून जाताना खाकीतील माणसाला अश्रू अनावर झाले. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस स्थानकात मिलिंद गायकवाड यांनी निरोप दिला.  आपल्या साथीदारांचे अश्रू पाहून मिलिंद गायकवाड यांनाही अश्रू रोखता आले नाही. दरम्यान,गायकवाड यांच्यासोबत अन्य पोलीस आधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र गायकवाड यांची झालेली बदली सर्वसामान्य बदल्यांचा भाग आहे की टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे बदली करण्याची आली आहे. यावर आता चर्चा सुरू झाली आहे. काय आहे प्रकरण ? हडपसरचे भाजप आमदार आणि भाजप युवा मोर्च्यांचे राज्याचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात 50 लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. योगेश टिळेकर आणि त्यांचा भाऊ चेतन टिळेकर यांनी कोंढवा परिसरात ऑप्टिक फायबरचं काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याला वारंवार फोन करून 50 लाख रुपयांची मागणी केल्याने या कंपनीचे दक्षिण पुणे विभागाचे अधिकारी रवींद्र बराटे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. इ व्हिजन टेलिइन्ट्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांना 7 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान खंडणी मागितल्याची तक्रार रवींद्र बराटे यांनी केलीये. एक महिन्यांपूर्वी यासंदर्भात तक्रार देण्यात आली होती आणि सोबत पुरावे म्हणून मोबाईलचे रेकॉर्डिंग ही देण्यात आले होते त्याचा महिनाभर तपास केल्यानंतर योगेश टिळेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ===============================
  First published: