ट्रेनरने Gym मालकावर सत्तुरने केले सपासप 17 वार, हत्येचा थरकाप उडवणार VIDEO

ट्रेनरने Gym मालकावर सत्तुरने केले सपासप 17 वार, हत्येचा थरकाप उडवणार VIDEO

अंगद सिंग यांचा सावनेर येथील वेकोली वसाहतीमध्ये ऑक्सिजन नामक जीम आहे. जीम सुरू करण्यापूर्वी तो आणि नरेंद्र सिंग दोघेही एका जीममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करायचे

  • Share this:

प्रशांत मोहिते, प्रतिनिधी

नागपूर, 13 जानेवारी : नागपुरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहे. रविवारी रात्री सावनेर शहरातील वाघोडा इथं एका जीम मालकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. जुन्या वादातून पाळत ठेवत बसलेल्या प्रशिक्षकाने जीम मालकावर सत्तुरने वार करून त्याला गंभीर जखमी केले. उपचारार्थ नागपूर येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

ही घटना सावनेर शहरातील वाघोडा इथं नागमंदिराजवळ काल रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. अंगद रवींद्र सिंग (३२, रा. वेकोलि वसाहत, सावनेर) असं मृताचे नाव आहे. तर नरेंद्र जयप्रकाश सिंग (29) असं आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंगद सिंग यांचा सावनेर येथील वेकोली वसाहतीमध्ये ऑक्सिजन नामक जीम आहे. जीम सुरू करण्यापूर्वी तो आणि नरेंद्र सिंग दोघेही शिव कोसे यांच्या सावनेर शहरातील जीममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करायचे. काही दिवसांनी अंगद सिंग याने स्वत:ची जीम सुरू केली. मात्र, नरेंद्र सिंग हा कोसे यांच्या जीममध्ये कार्यरत राहिला. याच काळात त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याने त्यांची अधूनमधून भांडणं व्हायची. याच राग नरेंद्रने मनात ठेवला आणि त्याच्यावर पाळत ठेवली.

अंगद सिंग रविवारी रात्री वाघोडा येथील कुणाल धाब्याजवळून मोटरसायकलने आला होता. ऑटोमोबाईलजवळ येताच पाळत ठेवून असलेल्या नरेंद्रने त्याच्यावर हल्ला चढवला. नरेंद्र सिंगने आपल्याकडे असलेल्या सत्तुरने अंगद सिंगवर हल्ला चढवला. त्यावेळी त्याच्या मित्रांनी नरेंद्रला अडवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्याने अंगदवर हल्ला सुरूच ठेवला. नरेंद्रने अंगदच्या डोके, मान आणि गालावर सत्तुरने सपासप वार केले. यात तो रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. अंगद खाली कोसळल्यानंतर विव्हळत होता. तरी सुद्धा जाताना नरेंद्र याने अंगदवर पुन्हा सत्तुरने वार करण्याचा प्रयत्न केला. पण, मित्राने अडवल्यानंतर नरेंद्र आपल्या दुचाकीवरून निघून गेला. गंभीर जखमी झालेल्या अंगदला त्याच्या मित्रांनी तातडीने रुग्णालयात घेऊन गेले पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

तसंच मृत अंगद रवींद्र सिंग हा निवडणुकीच्या काळात काही काळ कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांचे अंगरक्षक असल्याचंही बोललं जात आहे.

या प्रकरणी सावनेर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नरेंद्र विरुद्ध भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंदवला असून अटक करण्यात आली आहे.

Published by: sachin Salve
First published: January 13, 2020, 6:22 PM IST

ताज्या बातम्या