VIDEO : ‘फक्त नशीब बलवत्त म्हणून...’, अंगावरून गेली मालगाडी तरी वाचला जीव!

VIDEO : ‘फक्त नशीब बलवत्त म्हणून...’, अंगावरून गेली मालगाडी तरी वाचला जीव!

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील वडसा रेल्वे स्थानकावर घडला. दुपारच्या सुमारास एक मुलगा अचानक रेल्वे ट्रॅकवर येऊन झोपला.

  • Share this:

गडचिरोली, 12 डिसेंबर : नशीब बलवत्तर असेल तर काहीही होऊ शकतो, असे म्हणतात. असाच प्रकार महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील वडसा रेल्वे स्थानकावर घडला. दुपारच्या सुमारास एक मुलगा अचानक रेल्वे ट्रॅकवर येऊन झोपला, काही वेळानं एक मालगाडी या मुलाच्या अंगावरून गेली. आता तुम्हाला वाटत असेल की यात त्याला जीव गमवावा लागला असेल, मात्र असे काहीच झाले नाही. मालगाडी गेल्यानंतर हा मुलगा उठला आणि आपल्या घरी निघून गेला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मंगळवारी वडसा रेल्वे स्थानकात ही घटना घडली. मात्र, काही लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. मंगळवारी दुपारी गोंदियाहून बल्लारशाहकडे जाणारी प्रवासी गाडी वडसा रेल्वे स्थानकावर आली. ट्रेनमधील एक मुलगा खाली आला पण पुलावरून गेला नाही व दुसऱ्या बाजूला ट्रॅक ओलांडू लागला.

वाचा-निसर्गाचा आणखी एक चमत्कार, उस्मानाबादेत चक्क बोकड देतो दूध!

वाचा-...आणि रस्त्यात टोपी घालून पार्टी करताना दिसलं कबुतर, VIDEO VIRAL

दरम्यान, बल्लारशाह ते गोंदियाकडे जाणारी मालवाहतूक वेगवान त्याच्या दिशेने येत होती. जेव्हा मुलाने पाहिले की ट्रेन आपल्या दिशेने येत आहे तेव्हा त्यान धक्कादायक पाऊल उचललं. एका क्षणाचाही विलंब न लावता, हा मुलगा दोन्ही ट्रॅकच्यामध्ये झोपला आणि त्याच्या अंगावरून ही गेला ज्यानंतर मालगाडी त्याच्यावरुन गेली, त्याला खरचटलंही नाही. रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या लोकांनी या सगळ्या प्रसंगाचा व्हिडीओ आपल्या फोनमध्ये कैद केला. रेल्वे पोलीस सध्या या तरूणाचा शोध घेत आहेत, तसेच त्याचे नाव अद्याप कळलेले नाही.

वाचा-परदेशी क्रिकेटपटूनं अभिनेत्रीला केलं प्रपोज, IPL सारखा असणार लग्नाचा थाट

Published by: Priyanka Gawde
First published: December 12, 2019, 1:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading