Home /News /maharashtra /

बैलाने शिंग मारल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, बीडमधील धक्कादायक घटना

बैलाने शिंग मारल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, बीडमधील धक्कादायक घटना

परंतु जखम गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते.

    बीड, 16 मे :  बैल हा शेतकऱ्याचा पहिला मित्र.. शेतातली बहुसंख्य कामात बैल (bulls ) हा शेतकऱ्यांचा (farmer) पाठीराख्या असतो. मात्र, बैलाला वैरण टाकतांना बैलाने शिंग मारल्याने जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये (beed) घडली आहे. शेतकऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बीडच्या उत्तरेश्वर पिंप्री गावात घडली आहे. रामहरी उत्तमराव चंदनशिव वय 50 असं मयत शेतकऱ्याच नाव आहे. रामहरी चंदनशिव हे शेतकरी शेतात बैलाला वैरणकाडी करत असताना अचानक बैलाने शिंग मारून त्यांना जखमी केले. यामुळे शेतकरी चंदनशिव यांच्या गळ्यावर शिंग लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना सुरुवातीला केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (घोडागाडीच्या पुढे धावणे अंगलट आले, 3 ते 4 गाड्यांची तरुणाला चिरडलं, VIDEO) परंतु जखम गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र अवघ्या कांही तासातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने चंदनशिव कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. चंदशशिव यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्जबाजारीतून तरुण शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या दरम्यान, जळगावमध्ये कर्जबाजाराला कंटाळून ३७ वर्षीय तरूण शेतकऱ्याने राहत्या घरात आज सायंकाळी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रमोद भागवत पाटील असं मयत झालेल्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. प्रमोद भागवत पाटील हे आपल्या पत्नी व मुलासह आव्हाणे येथे वास्तव्याला होता. (आजीबाईंच्या एका एका उडीने वाढवली हृदयाची धडधड; वृद्धेचा जबरदस्त Skipping Video) शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. अक्षयतृतीया निमित्त पत्नी आरती ह्या मुलगा मनिष सोबत माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे प्रमोद हा घरी एकटाच होता. सोमवारी सायंकाळी त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. कर्जबाजारीतून आत्महत्या केल्याचे माहिती समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने घटना उघडकीला आली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या