अकोला, 09 जुलै: अकोला शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर मध्यरात्री भीषण अपघात (Road accident) झाला आहे. रिधोरा येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ कार आणि ट्रकच्या भीषण अपघात तिघे जण जागीच ठार (3 Death) झाले आहेत. कारमधील अन्य एकजण गंभीर जखमी (1 Injured) झाला आहे. रात्री 1 च्या सुमारास हा दुर्दैवी अपघात झाल्यानं मदत पोहोचायला बराच उशीर झाला. तोपर्यंत अपघातग्रस्त कारमधील तीन जणांनी तडफडून आपला जीव सोडला होता.
मध्यरात्री 1 च्या सुमारास घडलेला हा अपघात एवढा भयंकर होता की, या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. संबंधित अपघातग्रस्त कारमधून एकूण चारजण प्रवास करत होता. ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून शेगावकडून वाशिमच्या दिशेनं जात होते. दरम्यान रात्री एकच्या सुमारास एका भरधाव ट्रकने मृतांच्या कारला भीषण धडक मारली. या भीषण अपघात कार मधील तिघेजण जागीच ठार झाले, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.
हेही वाचा-भररस्त्यात व्यावसायिकावर गोळ्यांचा वर्षाव, गोळीबाराचा LIVE VIDEO
हा अपघात इतका भयंकर होता, की या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. ज्यामध्ये तीन जणांचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला. रात्री उशीरा एक जणाला गंभीर अवस्थेत उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
हेही वाचा-नागपूरमध्ये पुन्हा गँगवार, डोक्यात दगड घालून गुंडाला ठार मारले
मृत सर्वजण वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. वाशिमच्या दिशेनं जाताना त्यांच्या कारला हा भीषण अपघात झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, Death, Road accident