मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पंतप्रधान मोदी आज मुंबईत, वाहतुकीत कोणते बदल झाले आहेत ते वाचा

पंतप्रधान मोदी आज मुंबईत, वाहतुकीत कोणते बदल झाले आहेत ते वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संध्याकाळी 6:30 वाजता मुंबई मेट्रोच्या 2A आणि 7 या दोन लाईनचे उद्घाटन करतील आणि मेट्रोचा प्रवासही करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संध्याकाळी 6:30 वाजता मुंबई मेट्रोच्या 2A आणि 7 या दोन लाईनचे उद्घाटन करतील आणि मेट्रोचा प्रवासही करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संध्याकाळी 6:30 वाजता मुंबई मेट्रोच्या 2A आणि 7 या दोन लाईनचे उद्घाटन करतील आणि मेट्रोचा प्रवासही करतील.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 जानेवारी : राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी हे मुंबईत एक रोड शो सुद्धा करणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काही वाहतूक बदलही करण्यात आले आहेत.

आज कोणते वाहतूक बदल करण्यात आले -

गुरुवारी दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत पश्चिम उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि सर्व रस्त्यांवरील अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यातून रुग्णवाहिका, शाळेच्या बस आणि इतर बस वगळण्यात आल्या आहेत.

गुरुवारी दुपारी 4.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत बीकेसी रोडवरील एमएमआरडीए जंक्शन ते एमटीएमएल जंक्शनपर्यंतची वाहतूक नियमन आणि नियंत्रण करण्यात येणार आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी वरळी सी लिंककडून बीकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने एमएमआरडीए जंक्शन येथून धारावी टी जंक्शनवरुन कुर्ल्याकडे तसेच पूर्व द्रुतगती मार्गाकडे मार्गस्थ होतील.

संत ज्ञानेश्वर मार्गावरुन आयकर विभाग जंक्शनकडून पुढे बीकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने गुरुनानक रुग्णालयाजवळ जगत विद्यामंदिर जंक्शन येथून कलानगर मार्गे सरळ पुढे धारावी टी जंक्शनवरुन कुर्ल्याकडे मार्गस्थ होतील.

खेरवाडी शासकीय वसाहत मनाकिया पॅलेस, वाल्मिकी नगरकडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने, वाल्मिकी नगर येथून यू टर्न घेऊन शासकीय वसाहत मार्ग कलानगर जंक्शन येथून सरळ पुढे धारावी टी जंक्शन पुढेवरुन कुर्ल्याकडे मार्गस्थ होतील.

तसेच सर्व जंक्शन व रजाक जंक्शनवरुन पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सी लिंकच्या दिशेने जाणारी वाहने सुर्वे जंक्शन, रजाक जंक्शन, एमटीएनएल जंक्शन येथून एसीएसटी रोडने मुंबई विद्यापीठ मुख्यद्वार, आंबेडकर जंक्शन, हंसमुखा जंक्शन येथून पुढे इच्छितस्थळी मार्गस्थ होती.

पूर्व द्रुतगती महामार्ग, चुनाभट्टीवरुन कनेक्टर मार्गे येणारी वाहने एनएसई जंक्शन, आयकर विभाग जंक्शन, कौटुंबिक न्यायालय, एमएमआरडीएवरुन पुढे जातील.

हेही वाचा - मोदींच्या सभेबाबत मुंबई पोलिसांच्या नावानं मेसेज व्हायरल! पोलिसांचं मुंबईकरांना आवाहन

दरम्यान, सायंकाळी पाच वाजता पंतप्रधान मुंबईतील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, उद्घाटन आणि पायाभरणी करतील. संध्याकाळी 6:30 वाजता ते मुंबई मेट्रोच्या 2A आणि 7 या दोन लाईनचे उद्घाटन करतील आणि मेट्रोचा प्रवासही करतील. मुंबईत आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर सभेला संबोधित करणार आहेत. यामध्ये सुमारे 1 लाख लोक पोहोचण्याची अपेक्षा आहे.

First published:

Tags: Mumbai, Narendra Modi, Pm modi, PM Narendra Modi, Traffic