• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • भर पावसातही त्यांनी निभावलं कर्तव्य, नांदेडच्या पोलिसाला वरिष्ठांकडून मिळालं 'सरप्राईज'

भर पावसातही त्यांनी निभावलं कर्तव्य, नांदेडच्या पोलिसाला वरिष्ठांकडून मिळालं 'सरप्राईज'

मुसळधार पावसातही (Heavy rains) वाहतूक नियंत्रणाचं (traffic control) काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला (police) मिळालेल्या सरप्राईजची (surprise) दिवसभर शहरात चर्चा सुरू होती.

 • Share this:
  नांदेड, 18 ऑगस्ट : मुसळधार पावसातही (Heavy rains) वाहतूक नियंत्रणाचं (traffic control) काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला (police) मिळालेल्या सरप्राईजची (surprise) दिवसभर शहरात चर्चा सुरू होती. नांदेडमधील ट्रॅफिक पोलीस अशोक वाडेवाले यांना त्यांचं काम इमानेइतबारे करण्याचं अनोखं इनाम त्यांच्या वरिष्ठांकडून मिळालं. पावसातही निभावलं कर्तव्य नांदेडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असताना पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी बाईकवरून एका ठिकाणी चालले होते. शहरातील अत्यंत वर्दळीच्या साठे चौकात ते जेव्हा आले, तेव्हा त्यांना एक अनोखा प्रसंग दिसला. मुसळधार पाऊस कोसळत असतानादेखील वाडेवाले चौकात उभं राहून आपलं कर्तव्य बजावत होते. त्यांच्या जोडीला इतर कुणीही पोलीस नव्हता. मात्र ते एकटेच पावसात उभं राहून वाहतुकीचं नियंत्रण करत होते. साधारणतः पाऊस आल्यानंतर ट्रॅफिक पोलीस आसरा शोधून उभे राहतात आणि पाऊस थांबल्यानंतर पुन्हा काम सुरू करतात, असा अनुभव असतो. मात्र वाडेवाले यांनी मुसळधार पावसातही आपलं कर्तव्य सुरू ठेवल्याचं मोठं कौतुक तांबोळींना वाटलं. त्यांनी वाडेवाले यांना तातडीने 10 हजार रुपयांचं इनाम देण्यात यावं, अशी शिफारस केली आणि ती मंजूरही झाली. इनाम घेण्यासाठी निमंत्रण वरिष्ठांनी बोलावलं असल्याचा निरोप जेव्हा वाडेवाले यांना मिळाला, तेव्हा सुरुवातीला त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आपण अनावधानाने काही चूक तर केली नाही ना, याचा विचार ते करू लागले. मात्र जेव्हा आपल्याला कर्तव्य निभावण्यासाठी 10 हजार रुपयांचं इनाम मिळाल्याचं त्यांना समजलं, तेव्हा त्यांना कमालीचा आनंद झाला. हे वाचा -कोरोना लस घेतल्यानंतर आजारी पडला; आता सरकार देणार 1 कोटी 22 लाख रुपये आपण केवळ आपलं कर्तव्य बजावत होतो. नांदेडमधील साठे चौक हा वर्दळीचा चौक असतो. तिथली वाहतूक एकट्याला कंट्रोल होत नाही. मात्र आपण आपल्या परीने ते काम करत होतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे.
  Published by:desk news
  First published: