रायगड, 22 डिसेंबर : मुंबई-गोवा हायवेवर पेण वडखळ दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. विकेडं, नाताळ, वर्ष अखेर अश्या सलग सुट्यांमुळे पर्यटक कोकणाकडे निघाले आहेत. मुबंईकर, ठाणेकर चाकरमानी आणि पर्यटक मोठ्या सख्येंने कोकण आणि गोव्याकडे निघाल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. पनवेल-पेण-वडखळ मार्गावर जिते, हमरापुर, अंतोरा, रामवाडी, उचेडे, वडखळमध्ये वाहतुक पोलीस मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.