Home /News /maharashtra /

सलग पाचव्या दिवशी Traffic Jam, ठाणे-नाशिक हायवेवरुन प्रवास करणारे प्रवासी त्रस्त

सलग पाचव्या दिवशी Traffic Jam, ठाणे-नाशिक हायवेवरुन प्रवास करणारे प्रवासी त्रस्त

या महामार्गावर सलग पाचव्या दिवशी अभूतपूर्व वाहतूक कोंडी (Traffic Jam) पाहायला मिळतं आहे.

ठाणे, 23 सप्टेंबर: ठाणे- नाशिक महामार्गावर (Thane-Nashik Highway)पडलेल्या खड्ड्यांमुळे (potholes) या महामार्गावर सलग पाचव्या दिवशी अभूतपूर्व वाहतूक कोंडी (Traffic Jam) पाहायला मिळतं आहे. या वाहतूक कोंडीचे व्हिडिओ (Video) आता समोर आले आहेत. माजिवडा सर्कल कळवा उड्डाणपूल मुंब्रा टोल नाका भिवंडी मानकोली भिवंडी बायपास या सर्वच मुख्य मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे या महामार्गावर जवळपास आठ ते दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगाच लागलेल्या आहेत. विशेष करून अवजड वाहनांची संख्या या वाहतूक कोंडीमध्ये मोठी आहे. धक्कादायक म्हणजे ठाण्यात असलेल्या कोविड सेंटरवर रुग्णांना नेण्यास या वाहतूक कोंडीमुळे प्रचंड वेळ लागतोय. तर दुसरीकडे या महामार्गावर असलेले अनेक मोठे हॉस्पिटल विशेष करून ज्युपिटर हॉस्पिटल येथे जाण्यास लोकांना किमान दोन-तीन तास प्रवास करावा लागत आहे. ही वाहतूक कोंडी माजिवडा सर्कल आणि माजिवडा उड्डाणपूल पासून ते आता घोडबंदर ज्युपिटर हॉस्पिटल आणि बाळकुम या सर्व भागात प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली. दोन दिवसांपूर्वीच या वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळावी याकरता ठाणे वाहतूक पोलिसांनी स्वतःहून या महामार्गावरील अनेक खड्डे बुजवले होते. पण पुन्हा पाऊस पडला आणि या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे या मार्गावरून जाताना पाच ते सहा किलोमीटरच्या रस्त्याकरिता चार ते पाच तास वेळ लागतोय. असं असलं तरी या महामार्गावरील मोठंमोठे खड्डे बुजवण्यात प्रशासनाने थोडी देखील हालचाल केली नाही आहे. परिणामी या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून एका मुलाला आणि त्याच्या आईला या महामार्गावर आपले प्राण गमवावे लागलेत. कितीही तक्रारी केल्या किंवा आंदोलन केले तरी देखील या मार्गावर खड्डे बुजवण्यात प्रशासन पुढे येत नाही आहे. त्यामुळे नागरिकांनी आता नेमकं करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. '2022 पर्यंत भारतात तयार होणार 100 कोटी कोरोना लसींचे डोस' ठाणे नाशिक या महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे आता ठाण्यात देखील वाहतूक कोंडी होऊ लागलेली आहे. कारण ज्यांना भिवंडी किंवा नाशिक येथे जायचं असेल तर त्यांना हा एकच मार्ग आहे आणि त्यामुळे येथूनच प्रवास करावा लागतोय. खड्डे बुजवण्या करिता अनेक राजकीय पक्षांनी गांधीगिरी नाही तसंच तोडफोड करून आंदोलने देखील केली. एवढेच काय तर भिवंडीतील तरुणांनी इथं पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये रबरी बोट चालून एका अनोख्या पद्धतीने खड्ड्यांविरोधात आपला निषेध नोंदवला होता. पण तरी देखील इथले खड्डे जैसे थेच आहेत. मग नेमकं आता हे खड्डे बुजवणार कोण हा देखील मोठा प्रश्न आहे. IPL 2021: शिखर धवनचा सलग 6 व्या वर्षी रेकॉर्ड, विराट-रोहितला टाकलं मागं सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री एकनाथ शिंदे हे देखील याच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि ठाण्याचे रहिवासी देखील आहेत. तरी देखील या रस्त्यावर वाहतूक कोंडी ही पाहायला मिळतेच आहे. नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली होती. पण त्याचा देखील काही परिणाम होताना दिसत नाही आहे. कारण शेवटी या महामार्गावरील खड्डे वाहतूक पोलिसांनाच बुजवावे लागत आहेत. ही तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी असून लवकरच या महामार्गावरील खड्डे बुजवून वाहतूक कोंडी फोडली नाही तर नागरिकांच्या संयमाचा बांध फुटेल अशीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Eknath Shinde, Thane

पुढील बातम्या