• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • VIDEO: Lockdown असताना इतकं Traffic; नागरिक चाललेत तरी कुठं? वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकाही अडकली

VIDEO: Lockdown असताना इतकं Traffic; नागरिक चाललेत तरी कुठं? वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकाही अडकली

Traffic jam during lockdown: मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • Share this:
ठाणे, 6 मे: महाराष्ट्रात ब्रेक द चेन (Break the chain) अंतर्गत राज्य सरकारने (Maharashtra Government) कठोर निर्बंध लागू केले आहेत. मात्र, असे असतानाही मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai-Nashik Highway) मोठी वाहतूक कोंडी (Traffic jam) झाल्याचं पहायला मिळत आहे. नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील मानकोली ते माजिवडा या दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिका सुद्धा अडकल्याचं (Ambulance stuck in traffic) दिसत आहे. गेल्या दोन तासांपासून मुंबई-नाशिक महामार्गावर ही वाहतूक कोंडी झाली आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीत अडकल्याने प्रवाशी चांगलेच हैराण झाले आहेत. मात्र, प्रश्न असा उपस्थित होत आहे की, लॉकडाऊन असताना इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले तरी कशासाठी आणि चाललेत तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाहतूक कोंडी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिका सुद्धा अडकल्याचं पहायला मिळत आहे. ही रुग्णवाहिका वाहतूक कोंडीतून मार्ग काढत असल्याचं पहायला मिळत आहे. वाचा: लग्नाच्या एक दिवसापूर्वीच मिळणार होता डिस्चार्ज; Corona Positive रुग्णाचा भयावह अंत ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध राज्यात कोरोनाचा असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अतंर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. तसेच कठोर निर्बंध लागू केले आहेत. यानुसार 15 मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू कऱण्यात आली आहे आणि केवळ अत्यावश्यक सेवा, सुविधा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. यासोबतच भाजीपाला, दूध विक्री, किराणा दुकाने सुरू ठेवण्याच्या संदर्भातही राज्य सरकारने वेळ ठरवून दिली आहे. असे असताना महामार्गावर इतकी मोठी वाहतूक कोंडी झालीच कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Published by:Sunil Desale
First published: