मुंबई-पुणे महामार्गावर अभूतपूर्व कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहनं थांबवली

मुंबई-पुणे महामार्गावर अभूतपूर्व कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहनं थांबवली

अमृतांजन पुलाच्या इथं वाहनांच्या सहा ते सात किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. सध्या पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक थांबवलीय. दुसऱ्या बाजूनं पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरू केलीय.

  • Share this:

24 डिसेंबर : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आजही वाहतूक संथ गतीनं सुरू आहे.खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झालीय. अमृतांजन पुलाच्या इथं वाहनांच्या सहा ते सात किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. सध्या पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक थांबवलीय. दुसऱ्या बाजूनं पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरू केलीय.

लोणावळा शहरात अवजड वाहनांना बंदी करण्यात आलीय, कारण तिथेही मोठ्या प्रमाणात कोंडी झालीये. सलग लागून आलेल्या आलेल्या सुट्या आणि ख्रिसमस यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरायला निघालेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या खंडाळा घाटातील कोंडी हटवण्यासाठी पुण्यावरून येणारी वाहनं लोणावळ्याजवळ थांबवणार, असा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला आहे. टप्याटप्याने एक-एक तासाला अशी वाहनं रोखली जातील. लोणावळा येथे अडवली जाणारी वाहनांपैकी छोटी वाहनं लोणावळा शहरात सोडली जातील.

First published: December 24, 2017, 12:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading