मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /amravati violence : त्यांचा विषय झाला अन् व्यापाऱ्यांचे 800 कोटी बुडाले!

amravati violence : त्यांचा विषय झाला अन् व्यापाऱ्यांचे 800 कोटी बुडाले!

 संचारबंदी व इंटरनेटबंदीमुळे अमरावती शहरातील व्यापाराला जवळपास 800 कोटींचा फटका बसला.

संचारबंदी व इंटरनेटबंदीमुळे अमरावती शहरातील व्यापाराला जवळपास 800 कोटींचा फटका बसला.

संचारबंदी व इंटरनेटबंदीमुळे अमरावती शहरातील व्यापाराला जवळपास 800 कोटींचा फटका बसला.

अमरावती, 22 नोव्हेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेल्या अमरावती शहरात 12 व 13 नोव्हेंबर रोजी हिंसाचाराच्या (amravati violence) घटना घडल्यात. या हिंसाचारानंतर शहरात संचारबंदी लावण्यात आली तसेच मोठ्या प्रमाणात अफवांचं पेव येत असल्याने इंटरनेट सुद्धा बंद करण्यात आले होते. तब्बल 7 दिवसांपर्यंत इंटरनेट सेवा बंद (Internet service off) होती, तर शहरात संचारबंदी (Curfew) अद्यापही कायम आहेत. या संचारबंदी व इंटरनेट बंदीमुळे अमरावती शहरातील व्यापाराला जवळपास 800 कोटींचे नुकसान झाल्याचं समोर आलं आहे.

अमरावती शहरात आता शांतता आहे. पण, संचारबंदी कायम आहे. सध्या संचारबंदीत सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आल्याने अमरावती शहराचा व्यापार आता सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. मात्र या संचारबंदी व इंटरनेट बंदीमुळे अमरावती शहरातील व्यापाराला जवळपास 800 कोटींचा फटका बसल्याचं चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी सांगितले.यात तीस ते पस्तीस टक्के नुकसान हे औषधी व जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांचा आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एक ते दीड वर्ष चाललेल्या लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले होते. जिल्ह्यातील सर्वच लहान मोठ्या व्यापाऱ्यांना लॉकडाऊनचा फटका बसला होता. अशा परिस्थितीत शहरातील व्यापार सावरत असतानाच अमरावती शहरात 12 व 13 नोव्हेंबर रोजी हिंसाचाराच्या घटना घडल्या यामध्ये अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांची तोडफोड झाली तर शहरात जाळपोळ सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आली. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहरात 13 नोव्हेंबर पासून संचारबंदीचे आदेश देण्यात आलेले आहे यामुळे जीवनावश्यक वस्तू तसेच औषधे दुकान वगळता सर्व व्यापार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले होते.

अभिनेत्री मैत्रिणी होऊ शकत नाहीत पण सई-प्रियाचा हा फोटो पाहून विसराल ..

यामुळे व्यापाऱ्यांच्या नुकसानी मध्ये मोठी भर पडली. अमरावती शहरात रेडिमेड कापडांची मोठी बाजारपेठ आहे अमरावती शहरातील सिटी लँड आणि ड्रीम्स लँड व्यापारी बाजारपेठ आशिया खंडातील चीननंतर सगळ्यात मोठी कापडाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. येथूनच संपूर्ण विदर्भ व आसपासच्या राज्यातूनही लहान-मोठे व्यावसायिक रेडिमेड कापड खरेदीला येत असतात. शहरात सोन्या चांदीचा ही मोठा व्यापार व्यापार चालतो. संचारबंदीच्या काळात व इंटरनेटबंदीमुळे सगळे ऑनलाइन व्यवहार बँकिंग व्यवहार पूर्णतः ठप्प पडले होते.

अमरावती शहरात दर दिवशी शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांची उलाढाल होते यात वीस ते तीस टक्के व्यवहार ऑनलाइन होतो. मात्र नेट बंद असल्यामुळे हे सगळे व्यवहार ठप्प पडले याचा फटका व्यापाऱ्यांना बसला. अमरावती शहरात औषधी व्यवसायाची मोठी बाजारपेठ आहे मात्र संचारबंदीमुळे अनेक औषधी या गोडाउनमध्ये पडून होत्या.

महाराष्ट्रासाठी संतापजनक बातमी, डॉक्टर नववधूची होणार होती कौमार्य चाचणी!

या सात दिवसाच्या कालावधीमध्ये शहरात पंचवीस ते तीस टक्के जीवनावश्यक व हृदयविकाराच्या औषधांचा तुटवडा जाणवत होता. इंटरनेट सेवा व संचार बंदी मध्ये जर शिथिलता देण्यात आली नसती तर येणाऱ्या काळात याचा परिणाम आरोग्य सेवेवर सुद्धा पडला असता. आता संचारबंदीमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शिकतील का देण्यात आलेली आहे. त्यामुळे शहरातील सगळे व्यापारी प्रतिष्ठाने व दुकाने पूर्ववत उघडण्यात आली असली तरी अजूनही काही लोक दंगलीच्या धास्तीमुळे बाहेर निघायला धजावत आहेत.

या दंगलीमुळे आठ दिवस जो व्यापार पूर्णता बंद का होता याला आता सावरण्यासाठी किमान आणखी एखादा महिना तरी लागेल असं हॉटेल व्यवसायिक संघटनेचे सारंग राऊत यांनी सांगितलेले आहे. शहरातील हॉटेल व्यवसाय प्रमुख्याने सायंकाळी सहा ते अकरा च्या दरम्यान चालतो मात्र सहानंतर संचारबंदी लागू असल्याने शहरातील हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायिक पुन्हा एकदा अडचणीत आलेला आहे, आता  शांतता राखण्याचे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे.

First published:
top videos