मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

क्लचवर पाय पडला आणि 3 वर्षांच्या मुलासह ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, सांगलीतील दुर्दैवी घटना

क्लचवर पाय पडला आणि 3 वर्षांच्या मुलासह ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, सांगलीतील दुर्दैवी घटना

नेमके त्याच वेळी ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या दोन मुलांपैकी एकाचा पाय चूकून ट्रॅक्टरच्या क्लचवरती पडला. यामुळे अगोदरच उतारावर उभा असलेला ट्रॅक्टर....

सांगली, 24 जानेवारी : अचानक क्लचवर पाय पडल्यामुळे ट्रॅक्टर (Tractor) विहिरीत कोसळला आणि त्यासोबत पाण्यात बुडून 3 वर्षांच्या मुलाचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना सांगली (Sangali) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात घडली आहे. या दुर्घटनेत चार वर्षांच्या मुलाचा जीव थोडक्यात वाचला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. बनेवाडी येथील माळीवस्ती परिसरात श्रीरंग माळी यांची शेती आहे. शनिवारी ते शेतातील कामासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले होते. गुरुनाथ व तेजस ही दोन्ही मुले सोबत शेतात आली होती. 'पत्नी पळून गेली तर विसरून जा, दुसरीचा शोध घ्या'; न्यायाशीधांनी दिला सल्ला दिवसभरात शेतातील कामे उरकून घरी जाण्यासाठी माळी हे ट्रॅक्टरमध्ये बसले. तसंच दोन्ही मुलांनाही ट्रॅक्टरमध्ये बसवले. यावेळी शेतीकामासाठी आणलेले साहित्य विसरल्याचे लक्षात आले. श्रीरंग माळी साहित्य विसरलेले आणण्यासाठी गेले. नेमके त्याच वेळी ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या दोन मुलांपैकी एकाचा पाय चूकून ट्रॅक्टरच्या क्लचवरती पडला. यामुळे अगोदरच उतारावर उभा असलेला ट्रॅक्टर जोरदार वेगाने विहिरीच्या दिशेने गेला आणि विहिरीत पडला. यावेळी ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या दोन्हीपैकी एक मुलगा गुरुनाथ ट्रॅक्टरमधून खाली पडला. तेजस हा 3 वर्षाचा मुलगा ट्रॅक्टरसोबत विहिरीत पडल्याने पाण्यात पडला. तेजसला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी मात्र ग्रामस्थांना शर्थीचे प्रयत्न केले, पण उशीर झाला होता. बापरे! मुलीच्या पोटातून काढला एक फुटाहून लांब आणि 10 सेमी जाडीचा केसांचा गुच्छा विहिरीतून पाणी उपसा करण्यासाठी तीन विद्युत मोटरी आणण्यात आल्या. मात्र, याचवेळी लोडशेडिंग असल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. महावितरणने सहकार्य करत पुन्हा वीजपुरवठा सुरू केला. तब्बल 3 तास पाणी उपसा करीत तेजसला विहिरीतून बाहेर काढले. परंतु, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे माळी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या तीन वर्षांच्या तेजसचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या