मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'ओ दादा...दादा' तो हाक देत होता अन् ट्रॅक्टर पुरात वाहून गेला, 3 जण बुडाले, अमरावतीतला LIVE VIDEO

'ओ दादा...दादा' तो हाक देत होता अन् ट्रॅक्टर पुरात वाहून गेला, 3 जण बुडाले, अमरावतीतला LIVE VIDEO

दोघांचा जीव वाचला असून तिघांचा शोध अजूनही लागला नाही. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे.

दोघांचा जीव वाचला असून तिघांचा शोध अजूनही लागला नाही. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे.

दोघांचा जीव वाचला असून तिघांचा शोध अजूनही लागला नाही. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे.

अमरावती, 09 ऑगस्ट : राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. अमरावती जिल्ह्यातही संततधार पावसाने कहर केला आहे. मागील 24 तासांमध्ये वेगवेगळे घटनांमध्ये जिल्ह्यात 8 जण नदीच्या पुरात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात वाहून गेला. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पावसाने हाहाकार उडवला आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. जिल्ह्यतील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात बेंबळा नदीच्या पुरात ट्रॅक्टर पलटी होऊन पाच व्यक्ती वाहून गेले आहे. त्यामध्ये दोघांचा जीव वाचला असून तिघांचा शोध अजूनही लागला नाही. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. यामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यतील पळसमंडळ येथील सुरेंद्र डोंगरे तर धर्मापुर येथील शेषराव चावके, मारोती चावले हे वाहून गेले आहे. तर पळसमंडळ येथील अक्षय रामटेके, नारायण परतेकी वाचले आहे. वाहून गेलेल्या तिन्ही लोकांचा प्रशासन शोध घेत आहे. तर दुसरीकडे वरुड तालुक्यात दोन जण आणि तिवसाच्या शिवनगावात एक वृद्ध पुरात वाहून गेला आहे. (सरकारकडून विवाहित जोडप्यांना मिळतात 72000 रुपये, लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल?) वाहून गेलेल्या सहाही जणांचा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पण मुसळधार पावसामुळे अडथळा येत आहे. पुरात वाहून जाणाऱ्या सहा ही जनांचा NDRF कडून शोध सुरू आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्यात आज व उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील वरूड, जरुड ,गव्हानकुंड, सातनुर , बेनोडा येथील 1000 घरे पावसामुळे उद्ध्वस्त झालेली आहे जवळपास 500 च्या वर कुटुंब विस्थापित झाली आहे. शंभरच्यावर जनावरे ही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती तहसीलदार गजेंद्र मालठाणे यांनी दिली आहे. वरुड व जरुड येथे मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाल्याने १० टीम तयार करून सर्वेक्षण करण्याचे काम महसूल विभागाने सुरू केले आहे. वरुड व जरूड येथील 500 कुटुंब विस्थापित झालेली आहेत या कुटुंबांचं स्थलांतर वरुड येथील विविध शाळांमध्ये करण्यात आलेलं आहे याच ठिकाणी या नागरिकांची जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था व आरोग्य विभागाच्या वतीने त्यांची आरोग्य तपासणी सुद्धा केली जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या