तीन दिवसांची सुट्टी आल्यानं पर्यटक निघाले कोकणात

तीन दिवसांची सुट्टी आल्यानं पर्यटक निघाले कोकणात

तळकोकणात तर पर्यटकांची झुंबडच उडालीय. यावर्षी पर्यटकांनी मालवणला खास पसंती दिलीय.

  • Share this:

24 डिसेंबर : सलग तीन दिवसांची सुटी आणि लागूनच आलेल्या नाताळामुळे हजारो पर्यटक कोकणाच्या दिशेने निघालेत. तळकोकणात तर पर्यटकांची झुंबडच उडालीय. यावर्षी पर्यटकांनी मालवणला खास पसंती दिलीय.

शनिवार आणि रविवारची सुट्टी आणि सोमवारीच लागून आलेला नाताळ यामुळे या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक कोकणात दाखल झालेत. हर्णे, दापोली आणि गुहागर किनाऱ्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होण्यास सुरूवात झालीय. दाखल झालेल्या पर्यटकांनीही किनारपट्टीवर समुद्री खेळांचा आनंद घेतलाय.

पर्यटन आणि खेळांबरोबरच किनारपट्टीवर खवय्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.  खवय्यांसाठी माशांची खास मेजवानीचाही पर्यटक आस्वाद घेताहेत.  सुटी आणि नव्या वर्षाचा योग साधत हॉटेल्सचं बुकिंगही जवळजवळ चार जानेवारीपर्यंत फुल्ल झालेत.

पुढचे दोन दिवस अख्खं कोकण  हजारो पर्यटकांनी गजबजलेलं राहणार आहे.

First published: December 24, 2017, 9:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading