माथेरान, 30 मे :कोरोनामुळे (Corona) सर्वत्र लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. माथेरानच्या (matheran hill) पर्यटनास बंदी झाल्यामुळे येथील व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यात येथील अश्वचालकांना (matheran horse riding) त्याचा फटका जास्त प्रमाणात बसला आहे. त्यामुळे घोड्यांना खाद्य देण्यासाठी फक्त सामाजिक संस्था नाही तर राज्य सरकारने देखील पुढे येऊन माथेरान करता विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी स्थानिक व्यावसायिकांनी केली आहे.
माथेरानमध्ये कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असल्याने तिथले नैसर्गिक सौंदर्य हे 100 टक्के अबाधित राहिलेले आहे. त्याचबरोबर तिथला गावरानपणा देखील पूर्णपणे नैसर्गिक आहे. पर्यटन व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे घोडा या घोड्यांना खाद्य ही सर्वात महत्वाची बाब आहे. पण, लॉकडाऊन लागू झाल्यामुळे पर्यंटनाला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या घोड्यांना खाद्य पुरवण्याची मोठी गैरसोय झाली आहे. शिवाय माथेरानच्या जंगलात असलेले प्राणी विशेषता माकडांचे खूप हाल होत आहे.
अनिल परब अवघ्या दोन महिन्यांचे पाहुणे, भ्रष्टाचाराच्या आरोपासह सोमय्यांची टीका
या सर्वांवर तोडगा काढून त्यांना विशेष मदत जाहीर करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मुंबईजवळ असून देखील 100 टक्के नैसर्गिक राहण्याचे आपले वेगळेपण जपले आहे आणि याच कारणामुळे माथेरान हे जागतिक पातळीवरचे थंड हवेचे पर्यटनस्थळ बनले आहे. या पर्यटन स्थळाची किमया कायम ठेवायचे असेल तर या माथेरानला पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे, त्याकरता विशेष पॅकेज देणे हाच एक पर्याय तूर्तास तरी समोर दिसतोय. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारने माथेरानकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.
पोलिसांकडून मदतीचा हात
दरम्यान, काही सेवाभावी संस्था लॉकडाऊनच्या काळात मदतीसाठी पुढे सरसावल्या आहे. तसंच पोलिसांचा हातभार लागला आहे. उगम या सामाजिक संस्था व कर्जत माथेरान पोलिसांच्या वतीने येथील अश्व चालकांना व येथील माकडांना खाद्य वाटप कर्जतचे डी. वाय. एस. पी. अनिल घेरडीकर यांच्या हस्ते माथेरानमध्ये वाटप करण्यात आले.
दररोज 160 रुपयांच्या बचतीवर मिळतील 23 लाख रुपये,टॅक्स सूटपासून मिळतील अनेक फायदे
माथेरान पोलीस स्टेशन येथे काही वर्षांपूर्वी ब्लॅकी आणि ब्राऊनी हे दोन घोडे पोलिसांसाठी कार्यरत होते. त्यामुळे माथेरान पोलिसांसाठी घोडे हे नेहमीच जिव्हाळ्याचे राहिले आहेत. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडल्याने या मुक्या जनावरांना पौष्टिक चारा मिळावा याकरिता अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरानमध्ये कार्यरत असलेले पोलीस महेंद्र राठोड यांच्या प्रयत्नाने स्थानिक अश्व चालकांना घोड्यांसाठी पौष्टिक 2 टन चारा व माकडांसाठी खाद्य उपलब्ध करण्यात आले. यावेळी माथेरानचे ए. पी.आय. प्रशांत काळे, पोलीस महेंद्र राठोड, पोलीस पाटील आणि अश्व संघटनेच्या अध्यक्षा आशाताई कदम, शैलेश शिंदे व उगम फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत तांबे, सचिव वैभव रत्नपारखी,खजिनदार स्वप्निल तांबे व सर्व अश्वचालक उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.