नांदेड : भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकर देणार चव्हाणांच्या बालेकिल्ल्याला आव्हान

नांदेड : भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकर देणार चव्हाणांच्या बालेकिल्ल्याला आव्हान

नांदेडमधील लढत ही अतिशय रंगतदार अशीच होणार आहे.

  • Share this:

नांदेड, 23 मार्च : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आता थेट आव्हान देण्याची तयारी भाजपनं केली आहे. त्यासाठी भाजपकडून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना अशोक चव्हाण यांच्याविरोधात नांदेडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेससमोरचं आव्हान आणखीन कठीण होऊन बसलं आहे. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पण, भाजपनं आता थेट काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे यंदाच्या नांदेडमधील निकालाकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये काँटे की टक्कर होणार असून भाजपच्या या आव्हानाला आता अशोक चव्हाण कसे उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.

कोण आहेत प्रताप पाटील चिखलीकर?

मूळ काँग्रेसी असलेले प्रताप पाटील चिखलीकर हे लोहा-कंधार विधानसभेचे शिवसेना आमदार आहेत. पण, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शरद पवार आणि अजित पवार यांचे त्यांच्याशी जवळचे संबंध होते.

मतदान न केल्यास बँक खात्यामधून वजा होणार 350 रुपये? या बातमीतलं हे आहे तथ्य

भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार

नागपूर - नितीन गडकरी

धुळे- सुभाष भामरे

वर्धा - रामदास तडस

नंदुरबार - हीना गावित

रावेर - रक्षा खडसे

अकोला - संजय धोत्रे

गडचिरोली - अशोक महादेवराव नेते

चंद्रपूर - हंसराज गंगाराम अहिर

जालना - रावसाहेब दानवे

भिवंडी - कपिल पाटील

मुंबई उत्तर - गोपाल शेट्टी

उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन

अहमदनगर - सुजय विखे पाटील

बीड - डाॅ. प्रीतम मुंडे

लातूर - सुधाकरराव भालेराव-शृंगारे

सांगली - संजयकाका पाटील

SPECIAL REPORT : शिवसैनिकांपुढे भाजप नरमलं, सोमय्यांऐवजी छेडा मैदानात?

लोकसभा निवडणुक 2019

लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी

VIDEO: भातसा नदीवरील पूल कोसळला; नागरिक जीव धोक्यात घालून करत आहेत प्रवास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 08:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading