लग्नानंतर महिनाभरातचा बायकोने फोडले नवऱ्याचे बिंग..पोलिस वर्दीतील 'तो' निघाला वॉचमन

लग्नानंतर महिनाभरातचा बायकोने फोडले नवऱ्याचे बिंग..पोलिस वर्दीतील 'तो' निघाला वॉचमन

मुंबई पोलीस असल्याचं भासवत तोतया पोलिसाने एका तरुणीशी लग्न केले. लग्नानंतर महिनाभरातचा आपला नवरा पोलीस नसल्याचा तरुणीला संशय आला. पोलीस आयुक्तालयातून माहिती घेतल्यानंतर तिचा संशय खरा ठरला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीच्या फिर्यादीवरून अंबरनाथ पोलिसांनी सापळा रचून तोतया पोलिसाला गजाआड केले आहे.

  • Share this:

गणेश गायकवाड (प्रतिनिधी),

अंबरनाथ, 6 मे- मुंबई पोलीस असल्याचं भासवत तोतया पोलिसाने एका तरुणीशी लग्न केले. लग्नानंतर महिनाभरातचा आपला नवरा पोलीस नसल्याचा तरुणीला संशय आला. पोलीस आयुक्तालयातून माहिती घेतल्यानंतर तिचा संशय खरा ठरला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीच्या फिर्यादीवरून अंबरनाथ पोलिसांनी सापळा रचून तोतया पोलिसाला गजाआड केले आहे.

पोलिसी खाकी वर्दी अंगावर चढवून फोटो काढलेला हा किरण शिंदे आहे. मात्र, किरण खराखुरा पोलीस नसून तोतया पोलीस आहे. खाकी वर्दी घालून मिरवणाऱ्या किरणने आपण मुंबई पोलिसात क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत असल्याचे सांगत अंबरनाथमधील एका 21 वर्षीय तरुणीशी लग्न केले. तरुणीला आणि तिच्या घरच्यांना पोलीस वर्दीतील फोटो, वर्दीवरील नेम प्लेट आणि ओळखपत्र दाखवल्याने किरणवर त्यांचा विश्वास बसला. 13 डिसेंबर 2018 ला तरुणीचे लग्न किरण शिंदेशी लावण्यात आले. मात्र, वारंवार खाकी वर्दीवर घरी येणे, कामाची एकच नियमित वेळ असणे, याबाबत विचारणा केल्यास त्याने उडवाउडवीची उत्तरे देणे, यामुळे आपला नवरा पोलीस खात्यात नोकरीला नसल्याचा तिला संशय आला. अवघ्या एका महिन्यात या घडामोडी घडल्याने तिने ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यालयात जाऊन किरणची माहिती काढली. आपला नवरा पोलीस नसल्याचे तरुणीला समजले. तिला मोठा धक्का बसला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित तरुणीने अंबरनाथ पोलीस ठाणे गाठले आणि नवऱ्याच्या विरोधात तक्रार दिली. ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशाने या प्रकरणात लक्ष देण्याचे आदेश दिले. अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी किरणविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. पीडित तरुणीने किरणला बहाणा करून अंबरनाथ रेल्वे स्थानकावर बोलावून घेतले. त्यावेळी सापाळा रचलेल्या पोलिसांच्या तावडीत किरण सापडला. सध्या हा तोतया पोलीस जेलची हवा खातोय.

पीडित तरुणीची हुशारी, प्रसंगावधान आणि धैर्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे तिच्या हिंमतीला दाद द्यावी लागेल. या घटनेमुळे मात्र आता मुलीच्या पालकांना लग्न जुळवतांना आणखी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली.

VIDEO: लोकशाहीचा उत्साह, ढोल-ताशावर महिलांचा अनोखा डान्स

First published: May 6, 2019, 5:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading