राष्ट्रवादीने एकाच वेळी महाजन आणि फडणवीसांना केलं टार्गेट, यासह दिवसभरातील 15 महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादीने एकाच वेळी महाजन आणि फडणवीसांना केलं टार्गेट, यासह दिवसभरातील 15 महत्त्वाच्या बातम्या

हवामानाच्या अंदाजापासून ते राजकारण, क्रीडा, मनोरंजनासह महत्त्वाच्या बातम्या झटपट आढावा.

  • Share this:

मुंबई, 11 ऑक्टोबर: हवामानाच्या अंदाजापासून ते राजकारण, क्रीडा, मनोरंजनासह महत्त्वाच्या बातम्या झटपट आढावा.

1. लढण्यासाठी विरोधकच उरले नाहीत. मुख्यमंत्र्यांचा कोपरगावमध्ये विरोधकांवर जोरदार हल्लाबोल. विरोधकांनी पराभव मान्य केला असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.

2. कलम ३७० चा मुद्दा निवडणुकीत वापरला तर गैर काय ? चिखलीच्या सभेत भाजप अध्यक्ष अमित शाह यांची विरोधकांवर टीका

3. नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. कारण याबाबतच सुभाष देसाईंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. कुणाची माय व्याली तरी शिवसेना नाणार पुन्हा होऊ देणार नाही, अशा शब्दांमध्ये देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

4. जामनेरचा माणूस पडल्याशिवाय देवेंद्र फडणवीस सरकार पाडण्याचा आनंद मिळणार नाही. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

5. शिवसेनेचा 'वचननामा' उद्या सकाळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार प्रकाशित होणार. वचननाम्यात 10 रुपयांत जेवनाच्या थाळीसह मतदारांसाठी अनेक आश्वासनांचा पाऊस.

6. शिवसेनेचे पिंपरीतील उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवानगी पदयात्रा काढून प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार व शिवसेना नगर सेवक प्रमोद कुटे यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

7. ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर अपघातात  एका महिलेचा मृत्यू. भाईंदर पाड्याजवळ भरधाव कंटेनरनं धडक दिल्यानं दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू झाला आहे.

8. राहुल गांधींची मुंबईनंतर १५ ऑक्टोबरला विदर्भात सभा होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातही सभा घेणार असल्याची चर्चा आहे. डॉ. मनमोहन सिंगही प्रचारासाठी येणार असल्याची माहिती.

9. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शिवसैनिकांनी भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. युती असतानाही दक्षिण नागपूर मतदारसंघात सेनेच्या उमेदवारानं बंडखोरी केली. अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या किशोर कुमेरिया या उमेदवारासाठी शिवसैनिक एकत्र आले आहेत.

10. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस बाकी असतानाच सोलापुरात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. सोलापूरमधील काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष इंदुमती अलगोंडा यांनी पक्षाचा आणि जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

11. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भेट घेतली आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले नाशिक पूर्वचे उमेदवार बाळासाहेब सानप यांची संजय राऊत यांनी भेट घेतली. या भेटीने नाशिकमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

12. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडीक हे बोलताना चुकून 'कमळा' ऐवजी 'घड्याळा'चं बटन दाबा असं म्हणाले आणि सगळ्यांनाच त्यांची चूक लक्षात आली. त्यांनीही क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी चूक सुधारली आणि भाषण पुढे नेलं.

13. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लवकरच भाजपमध्ये विलीन होणार आहे.आमदार नितेश राणे हे सध्या भाजपच्या तिकिटावरच कणकवली मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे राणेंच्या स्वाभिमान पक्षाची भाजपमध्ये विलीन होण्याची औपचारिकता 15 ऑक्टोबरला पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.

14. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आजपासून दोन दिवसभारत दौऱ्यावर आहेत. चेन्नईतील विमानतळावर जिनपिंग यांचं स्वागत करण्यात आलं.

15. रसिकांच्या मनातला शहेनशाह आज झाला 77 वर्षांचा. बिग बी  अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव.

First published: October 11, 2019, 3:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading