नागपूरात भरदिवसा गुंडाची दगडाने ठेचून हत्या

काही वर्षांपूर्वी अक्कू यादव या गुंडाची नागपूरात दहशत होती. नागरिकांनी न्यायालयातच त्याची हत्या केली होती.

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2019 10:07 PM IST

नागपूरात भरदिवसा गुंडाची दगडाने ठेचून हत्या

नागपूर, 8 जुलै : नागपूरात गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. गुंडांची लोकांकडून किंवा नागरिकांकडून हत्या होण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. सोमवारी पुन्हा एकदा खळबळजनक घटना घडलीय. एका गुंडाला भरदिवसा ठार करण्यात आलंय. वयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. धंतोलीतल्या तकीया भागात ही घटना घडली.

नितीन कुलमेथे असं हत्या झालेल्या गुंडाचं नाव आहे. नितीनवर हत्येचा आरोप असून तो एका प्रकरणात तडीपार झाला होता. पंकज राऊत आणि मंगेश सोनवणे या आरोपींची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. त्यांच्यात पूर्वीचे वाद होते. त्या वादातून ही हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केला जातोय.

नितीन तकीय भागात येणार असल्याची माहिती आरोपींना होती. तो येताच या आरोपींनी त्याला घेरलं आणि मारायला सुरुवात केली. त्याला दगडांनी एवढं मारलं की त्यात मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. पोलीसांनी पंकज आणि मंगेश या दोनही आरोपींना अटक केलीय.

उद्याचा दिवस वैऱ्याचा; 24 तास धोका कायम : मुंबई पोलिसांनी दिला 'हा' इशारा

गरिबीला कंटाळून आईने मुलींना पाजलं विष आणि स्वत:केली आत्महत्या

Loading...

ठाणे जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. गरिबीला कंटाळून आईने आपल्या दोन मुलींना विष पाजले यात दोघींचा मृत्यू झालाय तर एक मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. मुलींना विष पाजून आईने स्वत:ही विष घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आलीय. रुक्षणा टोकरे या आपल्या चार मुलींसह इथे राहतात. जुनमध्ये त्यांच्या नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर या कुटुंबाची परवड सुरू झाली त्याला कंटाळून रुक्षणा यांनी घरी असलेल्या दोन मुलींना विष पाजलं आणि स्वत:ही आत्महत्या केली.

SPECIAL REPORT : राणेंवर का आली 'दादा माझ्या मुलाला वाचवा' म्हणण्याची वेळ?

पतीच्या निधनानंतर रुक्षणा यांचा आधारच गेला होता. पाचवीला असलेलं दारिद्रय, लहान मुली, कामचा अभाव यामुळे पैसेही नाहीत. त्यामुळे कुटुंबाचं पोट कसं भरायचं या विवंचनेत त्या त्रासून गेल्या होत्या. दररोजच्या जेवणाचीही भ्रांत असल्याने त्यांनी घरी असलेल्या दीपाली आणि वृषीली या मुलींना विष पाजलं आणि स्वत:ही विष घेऊन आत्महत्या केली. वृषीली ही फक्त 8 महिन्यांची आहे. तिने उलटी केल्याने तिचा जीव वाचला. तिच्यावर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 09:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...