अण्णांचं उपोषण, तोडगा निघणार?
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. अण्णा यांच्या उपोषणाचा हा चौथा दिवस आहे. त्यामुळे सरकार आणि अण्णा यांच्यामध्ये या मागण्यांबाबत काही तोडगा निघतो का, हे पाहावं लागेल.
शिवसेनेची विभागवार बैठक
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यासंदर्भातील तयारीसाठी शिवसेनेची मुंबईत विभागवार बैठक होणार आहे. या बैठकांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आढावा घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
भूकंपामुळे पसरली भीती
डहाणू आणि तलासरी तालुक्यात सातत्याने भूकंप होत आहे. यामध्येच शुक्रवारी एका 2 वर्षाच्या बालिकेचा बळी गेला आहे. भूकंपाच्या धक्क्याने भयभीत होऊन धावत असताना दगडावर आदळून या चिमुरडीचा दुर्दैवी मृ्त्यू झाला. अजूनही या भागात भीतीचं वातावरण कायम आहे.
निलेश राणेंवर गुन्हा दाखल?
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या निलेश राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा जहरी टीका केली. त्यानंतर शिवसैनिकांकडून पिंपरीत निलेश राणे यांच्याविरोधात केस दाखल करण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता यावर निलेश राणे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलं आहे.
व्हायरल मेसेज
सध्या एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजखाली एका अॅपची लिंकही देण्यात आली आहे. पण तुम्ही ही लिंक ओपन केल्यास तुमच्या मोबाईलमधून महत्त्वाची माहिती हॅक होण्याची शक्यता आहे. हा मेसेज अनेकांपर्यंत पोहचला असल्याने आता याबाबत कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.