प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद
मुंबईत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी ते लोकसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
सलमान खान आणि शरद पवार एकाच मंचावर
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात सायकल वाटप करण्यात येणार आहे. यावेळी सलमान खान आणि शरद पवार उपस्थित हेदेखील उपस्थित असतील
पुण्यात गडकरींची उपस्थिती
पुण्यात एका बँकेच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी येणार आहेत.
शिवराज सिंह चौहान आज जळगावात
जळगावमध्ये भाजप जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित असतील.
मुख्यमंत्री फडणवीस हिंगोलीत
हिंगोली इथं अटल महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी गिरीष महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.