बीड जिल्ह्यात चौथा पाणीबळी, ड्रम अंगावर पडून महिलेचा मृत्यू

बीड जिल्ह्यात चौथा पाणीबळी, ड्रम अंगावर पडून महिलेचा मृत्यू

बीड, जिल्ह्यात पाणी टंचाईने चौथा बळी घेतला आहे. ड्रम अंगावर पडून 28 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरून ड्रमने पाणी आणताना दुचाकी घसरली. याचवेळी पाण्याने भरलेला ड्रम महिलेच्या अंगावर पडला.

  • Share this:

बीड, 19 मे- जिल्ह्यात पाणी टंचाईने चौथा बळी घेतला आहे. ड्रम अंगावर पडून 28 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला.  ड्रमने पाणी आणताना दुचाकी घसरली. याचवेळी पाण्याने भरलेला ड्रम महिलेच्या अंगावर पडला. मिनाक्षी अनुरथ घुगे असे मृत महिलेचे नाव आहे.  ही घटना गुंजाळा येथे रविवारी सकाळी घडली.

बस अडवून चालक आणि वाहकास मारहाण

सर्व प्रवासी बसमध्ये बसल्याने स्वतःची गाडी रिकामी राहिल्याने एका अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्याने रागाच्या भरात बस अडवून चालक आणि वाहकास मारहाण केल्याची घटना माजलगाव येथे शनिवारी सकाळी ही घटना घडली. यानंतर मारहाण करणाऱ्यावर कारवाईची मागणी करत चालक वाहकांनी शिवाजी चौकात बस आडव्या लावत रास्तारोको आंदोलन केले.

पतीने फोडले पत्नीचे डोके

लोकांसमोर अपमान केला, पतीने पत्नीचे डोके फोडले चार लोकांमध्ये अपमान केल्याने पत्नीला मारहाण करत डोके फोडल्याची घटना केज तालुक्यातील लव्हुरी येथे काल घडली आहे. याप्रकरणी पतीसह सासुविरोधात केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रेश्मा शेख असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे.

दारुच्या नशेत मद्यपीने पेटवले स्वत: घर

दारुच्या नशेत एकाने स्वत: घर पेटवल्याची घटना घडली आहे. पत्नीने पतीविरुद्ध फिर्याद दिली आहे. धारूर तालुक्यातील जहागीरमोहा येथे दारुच्या नशेत मद्यपीने पत्नीला मारहाण करत स्वत:चे घर पेटवून दिले. यामध्ये एक लाखाचे नुकसान झाले असून पत्नीने पोलिस ठाणे गाठून पतीविरुद्ध घर पेटवून दिल्याबाबत फिर्याद दिली आहे. श्रीराम धर्मराज दराडे असं घर जळणाऱ्या पतीचे नाव आहे.

48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, आतापर्यंतच्या टाॅप 18 बातम्या, पाहा VIDEO

First published: May 19, 2019, 2:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading