सत्ता स्थापनेतील घडामोडी ते नुकसानग्रस्त भागांच्या पाहणीपर्यंतच्या बातम्या एक क्लिकवर

सत्ता स्थापनेतील घडामोडी ते नुकसानग्रस्त भागांच्या पाहणीपर्यंतच्या बातम्या एक क्लिकवर

सत्तास्थापनेच्या राजकारणापासून ते परतीच्या पावसापर्यंत बातम्यांचा झटपट आढावा.

  • Share this:

मुंबई, 03 नोव्हेंबर: सत्तास्थापनेसाठी राज्यात खलबतं सुरू असताना दुसरीकडे मात्र परतीच्या पावसानं बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. पिकांचं झालेलं मोठं नुकसान आणि पीकविम्याच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे. एकूणच राज्यात नेमकं काय सुरू आहे. वाचा महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात.

1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला दौऱ्यावर आहे. इथे अकोल्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करणार आहेत.

2. मुंबईमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या हरलेल्या उमेदवारांसोबत अजित पवार आढावा बैठक घेणार आहेत.

3. सदाभाऊ खोत आज भिवंडी दौऱ्यावर आहेत. पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेतीसह इतर पिकांची आज पाहाणी करणार आहेत.

4. आमदार आदित्य ठाककरे आज कोकण दौऱ्यावर असून कोकणातील भातशेतीच्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.

5. उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. परतीच्या पावसामुळे भुईसपाट झालेल्या पिकांची पाहणी करणार आहेत. तर दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे सत्तास्थापनेबाबत काय बोलणार? पीकविम्यासंदर्भात काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

6. गिरीश महाजन आज नाशिकमध्ये नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करणार आहेत. शनिवारी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अचानक झालेल्या अवकाळी पावसामळे नदी-नाल्यांना मोठे पूर आला होता. ओढ्यांवरील लहान पुल आणि नदीकाठच्या भागात पाणी पातळी उंचावली आहे. नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, नदीकाठांवर घरे असलेल्या नागरिकांनी उंच ठिकाणी आश्रय घ्यावा. याबाबत महाजन यांनी शनिवारी रात्री स्वत: भेटून नागरिकांना सूचना दिल्या होत्या.

7. भाजप आणि शिवसेनेमध्ये निर्माण झालेले कोंडी फुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी भेटणार आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ही कोंडी फुटावी यासाठी पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू होत्या. नेत्यांची वक्तव्य आणि ऐकमेकांवर टीका होत असली तरी दोन्ही बाजूने कोडीं फोडण्यासाठी प्रयत्न होत होते. सत्ता वाटपाचा फॉर्म्युलाही तयार करण्यात आला असून या दोन नेत्यांच्या बैठकीत त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

8. सत्ता स्थापनेला उशीर होत असल्याने शिवसेना भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतेय. त्या प्रयत्नांचाच भाग म्हणून राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार का अशी चर्चा सुरू आहे. मात्र राष्ट्रवादीला जनमतात बसण्याचा कौल मिळाला असून  ज्यांना जनतेने कौल दिला त्यांनी सरकार स्थापन करावं असं मत राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या दबावाच्या प्रयत्नांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

9. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर आज तांत्रिक कामांसाठी जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे गैरसोय होऊ नये यासाठी लोकलचं वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावं.

10. जम्मू आणि काश्मीर संदर्भातलं कलम 370 हटवल्यानंतर गुरुवारी केंद्र सरकारनं जम्मू आणि काश्मीरचं विभाजन करत त्यातून लेह-लद्दाखला केंद्र शासित प्रदेश म्हणून वेगळ केलं. त्यानंतर गृहमंत्रालयाने देशाचा नवा राजकीय नकाशा प्रसिद्ध केला असून त्यात जम्मू-काश्मीर आणि लेह-लद्दाखला वेगळं दाखविण्यात आलंय. आता देशात 28 राज्य आणि 9 केंद्र शासित प्रदेश झाले आहेत. 5 ऑगस्टला संसदेने 370वं कलम हटविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तीन महिन्यांनी आता देशाचा नवा राजकीय नकाशा तयार झाला आहे.

परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, पाहा GROUND REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 08:04 AM IST

ताज्या बातम्या