मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबई-पुणे महामार्गावरील टोलमध्ये मोठी वाढ! सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री

मुंबई-पुणे महामार्गावरील टोलमध्ये मोठी वाढ! सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री

येत्या 1 एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्सप्रेसवर टोलचे नवीन दर लागू होणार आहेत.

येत्या 1 एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्सप्रेसवर टोलचे नवीन दर लागू होणार आहेत.

येत्या 1 एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्सप्रेसवर टोलचे नवीन दर लागू होणार आहेत.

मुंबई, 25 फेब्रुवारी : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोलमुक्तीची अपेक्षा प्रवाशांकडून केली जात होती. मात्र या अपेक्षेवर विरजण पडणार असून एक्सप्रेस वेवरील टोल वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. येत्या 1 एप्रिलपासून मुंबई-पुणे असा नियमित प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या दरम्यान प्रवास करणाऱ्या कारसाठी तब्बल 40 रुपयांनी टोल वाढविण्यात आला आहे. सध्या कारसाठी आकारल्या जाणाऱ्या 230 रुपयांच्या टोलच्या किमतीत वाढ होऊन ही किंमत 270 पर्यंत पोहोचली आहे. 1 एप्रिलपासून टोलचे नवे दर लागू होणार आहे. कारबरोबरच मिनीबस व अवजड वाहनांकडून आकारल्या जाणाऱ्या  टोलच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत.

काय आहेत नवे दर

आतापर्यंत बससाठी 675 रुपये आकारले जात होते, त्यात वाढ होऊन हा आकडा 797 पर्यंत पोहोचला आहे. या सोबतच मिनीबस, ट्रक, बसेस, क्रेन या वाहनांचेही टोल आता वाढणार आहेत. तर मिनीबसचा टोल  355 वरुन 420 रुपये, ट्रक 2 ॲक्सलचा टोल 493 वरुन 580 रुपये, बसचा टोल 675 वरुन 797 रुपये, दोनपेक्षा जास्त ॲक्सल असलेल्या ट्रॅकचा टोल 1168 वरुन 1380 रुपये तर क्रेनचा टोल 1555 वरुन 1835 इतका होणार आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेसच्या टोलवसुलीचं कंत्राट आयआरबी इन्फ्रास्ट्रकचर या कंपनीला देण्यात आलं आहे. त्यानंतर या टोलमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 2004 आॅगस्ट साली म्हैसकर इन्फ्रास्ट्रकचर प्रायव्हेट कंपनीला 15 वर्षांसाठीचं दिलेलं कंत्राट 2019 आॅगस्ट रोजी संपुष्टात आलं होतं. आता आयआरबीला एमएसआरडीसीनं 8261 कोटी रुपयांकरता पुढील 15 वर्षांसाठी टोल वसुलीचं कंत्राट दिलं आहे.

मुंबई ते पुणे व पुण्याहून मुंबईपर्यंतचा प्रवास करण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही वर्षांपूर्वी येथे आकारला जाणार टोल माफ करण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. मात्र येत्या 1 एप्रिलपासून टोलच्या किंमतीत वाढ झाल्याने प्रवाशांना हा अधिकचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

टोलच्या किंमती वाढल्यामुळे हा प्रवासही महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टोल वाढल्यानंतर आता बस भाडंही वाढणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

First published:

Tags: Mumbai pune expreeway, Pune toll