liveLIVE NOW

Today's LIVE Updates: मुंबईत उद्यापासून लसीकरणाला पुन्हा सुरुवात

मुंबईमध्ये कोरोना व्हायरसचा दुसरा डोस अनेक ठिकाणी मिळत नाही आहे. यासंदर्भात विचारले असता 'दुसरा डोस मिळत नाही कारण केंद्र सरकारकडून उपलब्ध होत नाही', अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे.

 • News18 Lokmat
 • | August 04, 2021, 21:28 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 3 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:56 (IST)

  भारत विरुद्ध इंग्लंड पहिली टेस्ट मॅच
  भारतीय गोलंदाजांची शानदार कामगिरी
  इंग्लंडचा डाव 183 धावांमध्ये गुंडाळला
  जसप्रीत बुमराहला सर्वाधिक 4 विकेट्स
  शमी 3, शार्दूल ठाकूर 2, सिराजला 1 विकेट

  21:23 (IST)

  मुंबईत कोविड लसीकरण मोहीम पुन्हा सुरू होणार
  1 लाख 5 हजार प्रतिबंधक लसींचा साठा प्राप्त
  कोव्हिशिल्डचे 57 हजार, कोव्हॅक्सिनचे 48 हजार डोस
  प्रभागांतील लसीकरण केंद्रावर 100% वॉक इन सुविधा
  पहिल्या डोससाठी 30% लससाठ्याचा होणार विनियोग
  दुसऱ्या डोससाठी 70% लससाठ्याचा होणार विनियोग

  20:35 (IST)

  परमबीर सिंगांविरोधात लूकआऊट नोटीस
  28 जणांविरोधात लूकआऊट नोटीस जारी
  ठाणे पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी
  क्रिकेट बुकी सोनू जालाननं केली होती तक्रार

  20:9 (IST)

  लसीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा द्या, मनसेकडून कोर्टात हस्तक्षेप याचिका, संदीप देशपांडे व अखिल चित्रेंनी केली याचिका दाखल

  19:42 (IST)

  पंढरपूर - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला एक कोटीची मिळाली देणगी, पतीची शेवटची इच्छा पत्नीनं केली पूर्ण, एका महिला विठ्ठलभक्तानं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली देणगी

  19:37 (IST)

  '102 व्या घटनादुरुस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी'
  'केंद्रीय मंत्रिमंडळ समितीकडून प्रस्ताव मंजूर'
  राज्याला अधिकार देऊन प्रश्न सुटणार नाही - चव्हाण
  'राज्याला अधिकार देऊन काहीही फायदा नाही'
  'घटनादुरुस्ती प्रस्ताव मंजुरीनं अर्धवट काम झालं'
  अशोक चव्हाणांची केंद्राच्या निर्णयावर प्रतिक्रिया
  '50% आरक्षण मर्यादा शिथिल होणं गरजेचं'
  'आरक्षणाची 50 टक्के मर्यादा उठवायला हवी'
  मराठा आरक्षणाचा तिढा अद्यापही कायम

  19:26 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सिक्कीमचे मुख्यमंत्री तमांग यांनी घेतली सदिच्छा भेट

  19:22 (IST)

  रिलायन्स उद्योग समूहाचा पुढाकार, प्लास्टिक बॉटल पुनर्वापराची क्षमता दुप्पट करणार, आंध्र प्रदेशमध्ये हा प्रकल्प उभारणार

  19:10 (IST)

  मागास प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं केला मंजूर, याबाबत 
  केंद्रीय कायदा व न्यायमंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली - खासदार संभाजीराजे छत्रपती 

  18:56 (IST)

  मुंबईतील अतिवृष्टीतील पूरस्थिती रोखण्यासाठी जमिनीखाली पेटी जलवाहिनी, जलसंचयन बोगदे आवश्यक, महापालिकेला तांत्रिक सल्लागार नियुक्तीचे आदेश द्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आमदार सुनील प्रभूंची मागणी

  टोकयो ऑलिम्पिक 2020, कोरोना त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि देशभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स