दुष्काळापासून ते मराठा आरक्षणापर्यंत, आज दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या

दुष्काळापासून ते मराठा आरक्षणापर्यंत, आज दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या

आज दिवसभरातील या 5 महत्त्वाच्या बातम्या तुम्हीही वाचल्या पाहिजेत.

  • Share this:

मराठवाड्याच्या दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक

महाराष्ट्रातील 48 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारला मदतीची मागणी केली होती. मंगळवारी केंद्र सरकारने महाराष्ट्राला आणखी 2160 कोटींची मदत जाहीर केली. दुष्काळाच्या याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची मराठवाड्यामध्ये आढावा बैठक होणार आहे.

नेहरू सायन्स सेंटरमध्ये देशातील सर्वात मोठ पहिलं भव्य विज्ञान प्रदर्शन

मुंबईच्या नेहरू सायन्स सेंटरमध्ये बुधवारी सर्वात मोठं विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. हे विज्ञान प्रदर्शन देशाचं सर्वात मोठं पहिल प्रदर्शन असणार आहे. त्यामुळे विज्ञान प्रेमींसह अनेक नागरिक या प्रदर्शनाचा आनंद घेऊ शकतात.

मराठा समाजासा आरक्षण न लागू झाल्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका 

वैद्यकीय क्षेत्रात मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात आलेलं नाही. त्याविरोधात बुधवारी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यावर आता कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांचा पंढरपुरात दुष्काळी दौरा 

महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळाचं सावट पसरलं आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. तर दुष्काळामुळे शेतकरी हवालदील झाला. त्यासाठी आता नेत्यांनी दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी गावोगावी दौरे सुरू केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे पंढरपुरात दुष्काळी दौरा करण्यासाठी जाणार आहेत.

बुलढाण्यातील भेंडवळ येथील पावसाची भविष्यवाणी  

गेल्या काही दिवसांपासून फानी या चक्रीवादळाने थैमान घातलं आहे. त्याचा मोठा परिणाम हवामानावर झाला आहे. मंगळवारी आणि बुधवारी उष्णतेचा तडाखा वाढणार असल्याची माहिती देण्यात आली तर बुलढाणातील भेंडवळमध्ये पाऊस होणार असल्याची भविष्यवाणी हवामान खात्याकडून करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमाला काळजी घ्यावी असा सल्ला सरकारकडून देण्यात आला आहे.

 ​

First published: May 8, 2019, 6:35 AM IST

ताज्या बातम्या